दिवाळीनंतर जोमात सुरू होणार जलसंधारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 02:35 PM2018-10-24T14:35:43+5:302018-10-24T14:36:01+5:30

वाशिम : भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या जलसंधारणाची कामे दिवाळीनंतर जोमात सुरू होतील. त्यानुषंगाने पुर्वतयारी करण्याच्या अनुषंगाने ३० आॅक्टोबर रोजी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Water conservation works will be started after Diwali | दिवाळीनंतर जोमात सुरू होणार जलसंधारणाची कामे

दिवाळीनंतर जोमात सुरू होणार जलसंधारणाची कामे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या जलसंधारणाची कामे दिवाळीनंतर जोमात सुरू होतील. त्यानुषंगाने पुर्वतयारी करण्याच्या अनुषंगाने ३० आॅक्टोबर रोजी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बीजेएसच्या मुख्य कार्यालयातील ‘डायरेक्टर आॅपरेशन्स’ व वरिष्ठ पदाधिकारी, जिल्हा समन्वयक, नियुक्त केलेले व्यवस्थापक, सुपरवायझर, तालुका समन्वयक यासह प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा नोडल अधिकारी, तालुका समितीमधील सर्व संबंधित अधिकाºयांनी या बैठकीस उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. 
या बैठकीत जिल्हास्तरीय साप्ताहिक बैठकीचा दिवस निश्चित करणे, तालुकास्तरीय समितीची स्थापना, डिझेल वितरण व्यवस्था समजून घेणे, पुढील एक महिन्याच्या कामाचे नियोजन करणे व त्यास तांत्रिक, प्रशासकीय मान्यता देणे, बीजेएसच्या सद्या उपलब्ध असलेल्या मशीनचा ‘डिप्लॉयमेंट प्लान’ तयार करणे, दिवाळीनंतर ज्याठिकाणी जेसीबीचा पूर्णपणे वापर केला जाणार, त्याठिकाणी ‘एक्सकॅवेटर डिप्लॉयमेंट’ करण्यासंदर्भात चर्चा करणे, ‘बीजेएस’तर्फे प्रत्येक मशीनला लावण्यात येणाºया ‘ट्रकर’चे डेमो प्रेझेंटेशन देणे, ‘व्हाट्सअ‍ॅप पॉलिसी’ सुरू करण्यासंदर्भात चर्चा करणे, ‘बीजेएस रिपोर्टींग सिस्टीम’ची माहिती देणे आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

Web Title: Water conservation works will be started after Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.