जिल्हा सामान्य रुग्णालयात बसणार ‘वॉटर कुलर’

By admin | Published: April 7, 2017 03:04 PM2017-04-07T15:04:14+5:302017-04-07T15:04:14+5:30

आरोग्य प्रशासन जागे झाले असून रुग्णालयात ‘वॉटर कुलर’ बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

'Water cooler' to be shifted to District General Hospital | जिल्हा सामान्य रुग्णालयात बसणार ‘वॉटर कुलर’

जिल्हा सामान्य रुग्णालयात बसणार ‘वॉटर कुलर’

Next

लोकमतच्या वृत्ताची दखल
वाशिम : नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पाण्याअभावी शौचालये घाणीच्या विळख्यात अडकल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उघड्यावर शौचास जावे लागते, आदींबाबत लोकमतने ७ एप्रिलच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच सुस्तावलेले आरोग्य प्रशासन जागे झाले असून रुग्णालयात ह्यवॉटर कुलरह्ण बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत असल्याची बाब लोकमतने वृत्ताच्या माध्यमातून उजागर केली. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.बी.पटेल यांनी रुग्णालयात ह्यवॉटर कुलरह्ण बसविण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या असून येत्या २ ते ३ दिवसांत किमान ४ ह्यवॉटर कुलरह्ण रुग्णालयात लावले जातील, अशी ग्वाही त्यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.

Web Title: 'Water cooler' to be shifted to District General Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.