७९२ अंगणवाड्यांमध्ये जलसंकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:55 AM2021-02-27T04:55:04+5:302021-02-27T04:55:04+5:30

स्वत:च्या इमारतीत कार्यान्वित असलेल्या अंगणवाड्यांमध्ये वाशिम तालुक्यातील १३५ पैकी १७ ठिकाणी नळजोडणी आहे. रिसोड तालुक्यातील १४७ पैकी १४, कारंजात ...

Water crisis in 792 Anganwadas! | ७९२ अंगणवाड्यांमध्ये जलसंकट!

७९२ अंगणवाड्यांमध्ये जलसंकट!

Next

स्वत:च्या इमारतीत कार्यान्वित असलेल्या अंगणवाड्यांमध्ये वाशिम तालुक्यातील १३५ पैकी १७ ठिकाणी नळजोडणी आहे. रिसोड तालुक्यातील १४७ पैकी १४, कारंजात १४९ पैकी ३१, मालेगाव १४७ पैकी १५, मंगरूळपीर १६५ पैकी ३५; तर मानोरा तालुक्यातील १७६ अंगणवाड्यांपैकी १५ ठिकाणी नळजोडणी असून उर्वरित ७९२ अंगणवाड्यांमध्ये कार्यरत आशा, अंगणवाडीसेविका, स्वयंपाकी आणि शिकणारी चिमुकली मुले घरून आणलेले पाणी पित आहेत. दरम्यान, जलजीवन मिशनमधून सदर अंगणवाड्यांना नळजोडणीची सुविधा मिळण्याची बाब प्रस्तावित करण्यात आली असून लवकरच हा प्रश्न निकाली निघेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

.................

तालुकानिहाय आढावा

वाशिम - १३५ - ११८

रिसोड - १४७ - १३३

कारंजा - १४९ - ११८

मालेगाव - १४७ - १३२

मंगरूळपीर - १६५ - १३०

मानोरा - १७६ - १६१

.............

१०७६

एकूण अंगणवाड्या

७९२

नळजोडणी नसलेल्या अंगणवाड्या

Web Title: Water crisis in 792 Anganwadas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.