‘वॉटर कप’ स्पर्धेचे ६ आॅगस्टला होणार पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:27 AM2017-07-31T01:27:40+5:302017-07-31T01:30:45+5:30

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१७ चा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ६ आॅगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री शिवछत्रपती स्पोटर््स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथे होत आहे.

'Water Cup' price distribution will be held on 6th August | ‘वॉटर कप’ स्पर्धेचे ६ आॅगस्टला होणार पुरस्कार वितरण

‘वॉटर कप’ स्पर्धेचे ६ आॅगस्टला होणार पुरस्कार वितरण

Next
ठळक मुद्देसोहळा श्री शिवछत्रपती स्पोटर््स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथेमुख्यमंत्री राहणार उपस्थित कारंजा तालुक्याचा स्पर्धेत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: महाराष्ट्रातील गावांना दुष्काळाच्या या मगरमिठीतून सोडविण्यासाठी अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१७ चा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ६ आॅगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री शिवछत्रपती स्पोटर््स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथे होत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, पाणी फाउंडेशनचे सह-संस्थापक आमिर खान हेही उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत वाशिम तालुक्यातील कारंजा तालुक्याचा सहभाग होता.
वॉटर कप स्पर्धा २०१७ च्या पुरस्कार सोहळ्यात शेतकरी, उद्योजक, अभिनय क्षेत्राशी संबंधित अनेक व्यक्ती, शात्रज्ञ, सरकारी अधिकारी अणि सामाजिक कार्यकर्तेे, हे सर्व एकत्र येऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या ग्रामस्थांच्या प्रयत्नांचा गौरव करणार आहेत. त्यामुळे हा समारंभ सामाजिक स्तरातील विविध लोकांचा संगम असेल, असे याविषयी माहिती देताना पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी सांगितले आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या गावांना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख रुपये आणि २० लाख रुपये रोख देण्यात येतील. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाºया गावाला १० लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. वॉटर कपच्या निमित्ताने विजेत्या गावांना देण्यात येणाºया बक्षिसांची एकूण रक्कम ४ कोटी रुपयांहून अधिक आहे.
सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ मध्ये सहभागी झालेल्या १३ जिल्ह्यातील ३० तालुक्यांमध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज अणि धारूर, लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा आणि कळंब, औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री आणि खुलताबाद, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, माण आणि खटाव, पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि इंदापूर, सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि जत, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि उत्तर सोलापूर, अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, पातूर अणि अकोट, वाशिम जिल्ह्यातील कारंजा, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब आणि उमरखेड, वर्धा जिल्ह्यातील आर्वी, तसेच अमरावती जिल्ह्यातील वरूड आणि धार्णी या तालुक्यांचा समावेश आहे.

Web Title: 'Water Cup' price distribution will be held on 6th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.