वाशिम जिल्हयात तहानलेल्यांसाठी ठिकठिकाणी ‘पाणपोई’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 03:53 PM2019-04-15T15:53:59+5:302019-04-15T16:07:30+5:30
शहरात, ग्रामीण भागासह मुख्य रस्त्यावर पाणपाई (प्याऊ) उभारुन नागरिकांची तहान भागविण्याचे कार्य हाती घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : उन्हाळयाच्या दिवसात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठया प्रमाणात आवश्यकता भासते. अशावेळी त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येवू नये याकरिता अनेक समाजसेवक, समाजसेवी संघटनांसह नागरिकांनी शहरात, ग्रामीण भागासह मुख्य रस्त्यावर पाणपाई (प्याऊ) उभारुन नागरिकांची तहान भागविण्याचे कार्य हाती घेतले आहे.
वाशिम शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणपोई उभारण्यात आली आहे. या पाणपोईवर ग्रामीण भागातून येणारी जनता आपली तहान भागवितांना दिसून येत आहे. तसेच वाशिम येथून चोहोमार्गावर शहरानजिक व शहराबाहेर अनेकांनी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था्र केली आहे. वाशिम येथून अकोला मार्गावर जातांना सावरगाव बर्डे फाटयावर एका समाजसेवकांने थंड पाण्याची व्यवस्था फाटयावर केली. रिसोड रस्त्यावर वांगी फाटा, सवड फाटयासह अनेक ठिकाणी पाणपोई लागलेली दिसून येत आहे. हिंगोली रस्त्यावर गावाबाहेर गेल्याबरोबर एका धाबा मालकाने पाणपोईची व्यवस्था केली. तसेच मंगरुळपीर , शेलुबाजार रस्त्यावरही पाणपोई उभारण्यात आल्या आहेत. मंगरुळपीर रस्त्यावर महादेव मंदिराच्या बाजुला भव्य अशी पाणपोई एका नागरिकांनी उभारुन या रस्तयावरुन येºजा करणाºया नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. उन्हाळयात या सुरु केलेल्या पाणपोईमुळे जिल्हयातील नागरिकांची तहान भागविण्याचे महान कार्य यांच्या हातून होत आहे.
भारतीय जैन संघटनेकडून नागरिकांकडून शुध्द पाण्याची व्यवस्था
भारतीय जैन संघटना शाखा मेडशीच्यावतिने रस्त्यावरुन येºजा करणाºया नागरिकांसाठी शुध्द आरओची पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. भारतीय जैन संघटना शाखा मेडशीचे अध्यक्ष प्रेमचंद जैन , ब्राम्हणवाडा येथील प्रकाश सानप, मालेगाव येथील जगदीश पहारे , मेडशी येथील विजय तायडे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या पुढाकाराने सदर पाणपोई उभारण्यात आली असून येथे नागरिकांना शुध्द व थंड पाणी मिळत आहे. थंड पाण्यामुळे नागरिकांची तहान भागविण्याचे महान कार्य या व्यक्तिंकडून सुरु केल्याने रस्त्यावरुन जाणाºयां नागरिकांच्यावतिने त्यांचे आभार व्यक्त केल्या जात आहे. तसेच सदर उपक्रम ईतरांनीही राबवून उन्हाळयाच्या दिवसात पाण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याचे आवाहन या मान्यवरांच्यावतिने करण्यात येत आहे.