जलस्रोतांची पातळी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:27 AM2021-07-21T04:27:18+5:302021-07-21T04:27:18+5:30
-------------- उंबर्डा येथे पशू लसीकरण वाशिम : पावसाळ्याच्या दिवसांत गुरांना होणारे विविध आजार रोखण्यासाठी पशू संवर्धन विभागाकडून गुरांना लसीकरण ...
--------------
उंबर्डा येथे पशू लसीकरण
वाशिम : पावसाळ्याच्या दिवसांत गुरांना होणारे विविध आजार रोखण्यासाठी पशू संवर्धन विभागाकडून गुरांना लसीकरण केले जाते. आता पावसाळा सुरू झाल्याने उंबर्डा बाजार परिसरात पशू संवर्धन विभागाने गुरांना लसीकरण सुरू केले आहे.
-------
जलवाहिनी फुटली; पाण्याचा अपव्यय
वाशिम : जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी ग्रामीण भागांत लिकेज झाली आहे. त्यामुळे या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणारे पाणी रस्त्यावर साचून गटारे तयार होत आहेत. शिवाय पाण्याचा अपव्यय होत आहे.
--------------
कीडनियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : कृषी विभागाकडून खरीप पिकांवरील किडीच्या नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. सोमवारी कृषी साहाय्यकांनी शेतांना भेटी देऊन किडींचे प्रकार आणि त्यावर नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
--------------
आसेगावात नाल्यांची सफाई
वाशिम : आसेगाव येथील नाल्यांत कचरा खच्चून भरला असून, गत दोन दिवसांत पडलेल्या पावसानंतर नाल्यांतील सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. यामुळे आरोग्याला असलेला धोका लक्षात घेत ग्रामपंचायतीने नाल्यांची सफाई सुरू केली आहे.