मुक्या चिमण्यांसाठी झाडांवर लावले जलपात्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 06:08 PM2019-03-19T18:08:51+5:302019-03-19T18:09:08+5:30
राष्ट्रीय हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी १९ मार्चला शाळा परिसरातील झाडांवर मुक्या चिमण्यांसाठी ठिकठिकाणी जलपात्र लावून पक्षीप्रेमाची प्रचिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून स्थानिक एस.एम.सी. इंग्लिश स्कुलमधील राष्ट्रीय हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी १९ मार्चला शाळा परिसरातील झाडांवर मुक्या चिमण्यांसाठी ठिकठिकाणी जलपात्र लावून पक्षीप्रेमाची प्रचिती दिली.
प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षांचे रणरणत्या उन्हापासून संरक्षण आणि पर्यावरणाचा ºहास थांबविण्याच्या उद्देशाने झाडांवर जलपात्र लावण्यात आले. तसेच पक्षांना दाणे पुरविण्याचीही सोय उभारण्यात आली.
नागरिकांनीही आपल्या घराच्या छतावर व आसपासच्या परिसरात पाण्याचे छोटेसे भांडे ठेवावे व पक्षांना दाणे टाकावेत. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पक्षांची सोय होईल, असे आवाहन प्राचार्य मीना उबगडे यांनी यावेळी केले. या उपक्रमासाठी हरितसेनेचे पौर्णिमा डोंगरे, प्रियंका शिरसाट, मेघा शर्मा, सरगम सोनोने, कृष्णाली ईढोळे, शंतनु सोळंके, विशाल वानखेडे, कल्याण देशपांडे, धनंजय काकडे, खुशी चौधरी, ऋतुजा पंडित, यशराज पाटील, महादेव काकडे, स्नेहल लांडकर , भूमी गवई, अनुष्का जैस्वाल, स्नेहल शिखरे आदिंनी पुढाकार घेतला.