महावितरणचे थकीत देयक भरल्याने गावातील पाणीप्रश्न मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:59+5:302021-07-10T04:27:59+5:30
काजळेश्चर उपाध्ये : थकीत देयकाअभावी ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा कपात केल्याने, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे ‘लाेकमत’ने वृत्त ...
काजळेश्चर उपाध्ये : थकीत देयकाअभावी ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा कपात केल्याने, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, याची ग्रामपंचायतने दखल घेत थकीत देयकाचा भरणा केला. यामुळे गावातील पाणीप्रश्न मिटला.
महावितरणचे थकीत बिल ग्रामपंचायत काजळेश्वरकडे असल्याने सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा व ग्रामपंचायत भवनाचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे ग्रामवासीयांची दहा दिवसांपासून असुविधा निर्माण झाली होती. या आशयाचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच, पैशाची तरतूद ग्रामपंचायत प्रशासनाने करून, गुरुवारला अंशता थकबाकीचा धनादेश महावितरण कारंजा यांचेकडे ग्रामविकास अधिकारी काजळेश्वर यांनी दिल्याने गामस्थांची पाणी समस्या सुटणार आहे.
काजळेश्वर ग्रामपंचायतकडे महावितरणचे थकीत बिल असल्याने, महावितरणने काजळेश्वर सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या रोहित्रावरून विद्युत २९ जून रोजी खंडित केली. त्यामुळे ग्रामस्थांची नळयोजना बंद पडली. सद्या कामाचे दिवस असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी दहा दिवस पायपीट झाली. दै.लोकमतने सदरचे वृत्त प्रकाशीत केले, त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेत, जमेल तेवढा निधी महावितरणला ग्रामविकास अधिकारी सतीश वर्घट यांनी धनादेशाने अंशत: सुपुर्द केला. त्यामुळे महावितरण ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभाग काजळेश्वरची विद्युत नियमित करणार असून, पाणी समस्या सुटणार आहे.
-------------
ग्रामस्थांकडे करापोटी मोठी वसुली बाकी आहे. ग्रामस्थांची पाण्याची समस्या सुटावी, म्हणून मनापासून प्रयत्न करीत आहोत. अंशत: महावितरण कारंजाला धनादेश दिला. महावितरणला विनंती करून, ग्रामस्थांची पाण्याची समस्या सोडविण्याचा मनापासून प्रयत्न केला. महावितरणने सहकार्य दिले आहे.
सतीश वर्घट
ग्रामविकास अधिकारी काजळेश्वर.