१२ गावांत पाणीटंचाई; सहा ठिकाणी विहीर अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:43 AM2021-05-27T04:43:29+5:302021-05-27T04:43:29+5:30

२०२० मध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. तालुक्यातील दहा बॅरेजसह २५ प्रकल्प तुडुंब होते. ...

Water scarcity in 12 villages; Acquisition of wells at six locations | १२ गावांत पाणीटंचाई; सहा ठिकाणी विहीर अधिग्रहण

१२ गावांत पाणीटंचाई; सहा ठिकाणी विहीर अधिग्रहण

Next

२०२० मध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. तालुक्यातील दहा बॅरेजसह २५ प्रकल्प तुडुंब होते. त्यामुळे उन्हाळ्यात तालुक्यातील गावांमध्ये फारशी पाणीटंचाई जाणवणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार वाशिम तालुक्यातील ९० गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट राहण्याचा अंदाज तालुका प्रशासनाने वर्तविला होता. पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यामध्ये विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, कूपनलिका आदींचा समावेश आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीटंचाई असणाऱ्या सहा गावांमध्ये विहीर अधिग्रहण, तर दोन ठिकाणी बोअर अधिग्रहीत करण्यात आले. टँकरचा प्रस्ताव नसल्याने सुरू करण्यात आले नाही, असे पंचायत समिती प्रशासनाने सांगितले. गतवर्षी दोन ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला होता. गत दोन वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईची धग कमी असल्याचे दिसून येते.

००००

कोट बॉक्स

गत दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी वाशिम तालुक्यात फारशी पाणीटंचाई नाही. पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांत उपाययोजना केल्या जात आहेत. सहा विहिरी, दोन बोअरचे अधिग्रहण करण्यात आले. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

- प्रमोद बदरखे

गटविकास अधिकारी, वाशिम

००००००००

Web Title: Water scarcity in 12 villages; Acquisition of wells at six locations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.