मालेगाव तालुक्यातील १५ गावांना पाणीटंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 02:38 PM2021-05-22T14:38:54+5:302021-05-22T14:39:29+5:30
Washim News : मालेगाव तालुक्यातील १५ गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
मालेगाव : मालेगाव तालुक्यातील १५ गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, १३ ठिकाणी विहिर अधिग्रहण करण्यात आले तर ३ गावात टँकरसाठी प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी एका गावात टँकर सूरु झाले आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरूवातीला मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी बºयापैकी पाऊस झाल्याने तसेच त्यानंतरही परतीच्या पावसामुळे प्रकल्पात बºयापैकी जलसाठा होता. जलपातळीतही फारशी घट नाही. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची तिव्रतादेखील कमी असल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी १५ पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली होती. जवळपास १२ ठिकाणी विहिर अधिग्रहण केले होते तर पाच ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा मे महिन्याच्या तिसºया आठवड्यातही तालुक्यातील ग्रामपंचायतीचा टँकरसाठीचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला नाही. आता तीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुक्यातील पांगरी कुटे, शेलगाव बोदाडे, ब्राह्मणवाडा खुर्द, मानका, कोलही, वारंगी, बोर्डी, जउळका, वरदरी बुद्रुक, वरदरी खुर्द, राजुरा, गीव्हा कुटे, भेरा, खैरखेडा, पिंपळवाडी या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. याशिवाय काही गावात शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ गावकºयांवर आली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा मंजूर आहे. परंतू, त्या तुलनेत प्रभावी अंमलबजावणी नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे टँकर, नळ दुरूस्ती, विहिर अधिग्रहण आदीबाबत फारसे प्रस्ताव नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.
बारा ठिकाणी विहिर अधिग्रहण
तालुक्यातील १२ गावात विहिर अधिग्रहणाचे आदेश झाले असून, त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे गावकºयांना तुर्तास दिलासा मिळत असल्याचे दिसून येते.
आमच्याकडे जे प्रस्ताव आले, ते मंजुरीकरिता पाठवण्यात आले आहेत. अजून जे प्रस्ताव प्राप्त होतील, ते पाठवून पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल.
श्रीनिवास पदमनवार
गटविकास अधिकारी, पं स मालेगाव