पाणीटंचाईचा शौचालय वापराला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:05 PM2019-03-15T13:05:29+5:302019-03-15T13:05:35+5:30

वाशिम : ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा फटका शौचालय वापराला बसत आहे. जेथे पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नाही; तेथे शौचालयासाठी पाणी कुठून आणावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेमधून उपस्थित केला जात आहे.

water scarcity; efect on toilets | पाणीटंचाईचा शौचालय वापराला फटका

पाणीटंचाईचा शौचालय वापराला फटका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा फटका शौचालय वापराला बसत आहे. जेथे पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नाही; तेथे शौचालयासाठी पाणी कुठून आणावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेमधून उपस्थित केला जात आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्हा हगणदरीमुक्त झाल्यानंतर दुसºया टप्प्यातील कामकाजाला सुरुवात झाली आहे. बांधलेल्या शौचालयाचा पुर्णपणे वापर, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता, सार्वजणिक शौचालये व शोषखड्डे यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन कक्षाने गृहभेटीद्वारे गावोगावी जनजागृती करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.  सर्वांच्या सहकार्यातून १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेले आहे. अडथळ्यांची शर्यत जिंकल्यानंतर जिल्हा (ग्रामीण) हगणदरीमुक्त घोषित झाला असून, दुसºया टप्प्याला सुरूवात झालेली आहे. बांधलेल्या शौचालयाचा पूर्ण वापर करणे, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता, सार्वजनिक शौचालये व शोषखड्डे यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भागात घरी शौचालय असूनही अनेकजण उघड्यावर शौचास जातात. आता तर पाणीटंचाई निर्माण झाल्याने शौचालयासाठी पाणी कुठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: water scarcity; efect on toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.