खापरदी येथे पाणीटंचाई; नागरिक त्रस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:30 AM2021-06-02T04:30:41+5:302021-06-02T04:30:41+5:30
यंदा तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने ...
यंदा तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत. तथापि, ग्रामीण भागात फारशा उपाययोजना केल्या जात नसल्याचे खापरदरी येथील पाणीटंचाईवरून दिसून येते. गावात सरपंच, पोलीस पाटील, नायक, कारभारी तथा इतर पंचमंडळी व गावातील अनेक शासकीय कर्मचारी या सर्वांना ही भीषण पाणी समस्या दिसत नाही का?असा सवालही गावातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. सर्वसामान्य जनता एका विश्वासाने लोकप्रतिनिधी निवडून देतात आणि निवडून गेल्यानंतर अनेकजण जबाबदाऱ्या विसरतात. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, असे जानकीराम राठोड यांनी सांगितले. गावातील पाणीप्रश्न कधी मार्गी निघेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पाणीटंचाई निवारणार्थ प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी मंगळवारी केली.