जउळका रेल्वे येथे पाणीटंचाई !

By admin | Published: May 8, 2017 01:53 PM2017-05-08T13:53:15+5:302017-05-08T13:53:15+5:30

काटेपुर्णा नदीवरील जलाशय कोरडा पडल्याने जउळका रेल्वे तसेच परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.

Water shortage at Jugalka railway! | जउळका रेल्वे येथे पाणीटंचाई !

जउळका रेल्वे येथे पाणीटंचाई !

Next

जउळका रेल्वे  : येथील काटेपुर्णा नदीवरील जलाशय कोरडा पडल्याने जउळका रेल्वे तसेच परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.
दरवर्षी जउळका रेल्वे गावात तसेच परिसरात पाणीटंचाई भीषण स्वरुप धारण करते. पाणी टंचाईमुळे नागरिकांना हिवाळयापासूनच कामधंदे सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करयाची गरज असताना प्रशासन वेळकाढूपणा करीत आहे. परिणामी जनता पाण्यासाठी त्रस्त झाली आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी फेब्रुवारी मार्चमध्ये विहीर किंवा कुपनलीका अधिग्रहीत करणे गरजेचे आहे .मात्र याकडे फारसे गांभीर्याने पाहीले जात नाही. जउळका रेल्वे येथील वार्ड क्रमांक एकमधील दलित वस्तीत, आदिवासी वस्तीमध्ये भिषण पाणी टंचाई आहे. मागील दहा ते बारा वर्षापासून पाणी फिल्टर व पाण्याची टाकी बांधण्यात आली. या पाण्याच्या टाकीवर लाखो रुपये खर्च केल्यानंतरही याचा काहीच फायदा झाला नाही. तीन गाव पाणी पुरवठा योजनेकडे कुणाचेही लक्ष नाही. पाणीटंचाई निवारण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी सोमवारी केली.

Web Title: Water shortage at Jugalka railway!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.