भर जहॉगीर आरोग्य उपकेंद्राला पाण्याचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 04:59 PM2020-08-17T16:59:23+5:302020-08-17T16:59:30+5:30
आरोग्य तपासणी तसेच सर्वेक्षणाची मोहिमही सोमवारी प्रभावित झाल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : संततधार पावसामुळे तालुक्यातील भर जहॉगीर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला १६ आॅगस्टपासून पाण्याने वेढा दिल्याने आरोग्य कर्मचाºयांसह रुग्णांची गैरसोय झाली. आरोग्य तपासणी तसेच सर्वेक्षणाची मोहिमही सोमवारी प्रभावित झाल्याचे दिसून आले.
भर जहॉगीर येथे साधारणत: दहा वर्षांपूर्वी आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली. या उपकेंद्र परिसरातच आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत असून, गावातील रुग्णांवर उपचार केले जातात. मागील चार दिवसात भर जहॉगीर येथे पाच जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. खबरदारीचा उपाय म्हणून उपकेंद्रातील आरोग्य पर्यवेक्षक गजानन पद्मणे तसेच मोप प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.अशिष सिंह, डॉ.स्मिता बबेरवाल यांच्यासह आरोग्य चमूने गावात आरोग्य तपासणी व घरोघरी सर्वेक्षणाला सुरूवात केली. संततधार पावसामुळे आरोग्य उपकेंद्राभोवती पाण्याने वेढा दिल्याने उपकेंद्रातून बाहेर निघणे कठीण झाले. सोमवारी आरोग्य तपासणी व सर्वेक्षणाची मोहिम प्रभावित झाल्याचे दिसून आले. उपकेंद्र परिसरात पाणी साचणार नाही, यासाठी वरिष्ठांनी लक्ष द्यावे आणि पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी गावकºयांनी सोमवार, १७ आॅगस्ट रोजी केली.
भर जहॉगीर येथे कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आल्याने मोप प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे तात्काळ तपासणी मोहिम राबविण्यात आली. परंतु येथील आरोग्य उपकेंद्र परिसरात पाणी साचल्याने आजच्या तपासणी मोहिमेत मोठा व्यत्यय आला.
- गजानन पद्मणे
आरोग्य पर्यवेक्षक, भर जहॉगीर