आसेगाव परिसरातील जलस्त्रोत कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:15+5:302021-07-07T04:51:15+5:30
-------- अडोळ प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय वाशिम : अडोड येथील अडाण प्रकल्पातून रिसोड शहरासह अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. ...
--------
अडोळ प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय
वाशिम : अडोड येथील अडाण प्रकल्पातून रिसोड शहरासह अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. यावरील पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या व्हॉल्वला गळती लागल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या व्हॉल्वची दुरुस्ती ही करण्यात आली होती.
-----------
वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान
वाशिम : उंबर्डा बाजार परिसरात सध्या पिके अंकुरली असून, हरिण, माकड आदी वन्यप्राणी पिकांत धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे ५ जुलै रोजी दिसून आले. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली.
----------
डवरणीत शेतकरी व्यस्त
वाशिम : सध्या पावसाने चार दिवसांपासून उसंत घेतल्याने शेतजमीन पेरणीसाठी योग्य झाली आहे. त्यामुळे खरीप पेरणी करण्यात शेतकरी व्यस्त असल्याचे ०३ ते ०५ जुलै दरम्यान दिसून आले. प्रामुख्याने सोयाबीन पेरणीवर शेतकऱ्यांचा अधिक भर आहे.
-----------
जामदरा प्रकल्पावर वाढली झुडपे
वाशिम : मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथील प्रकल्पाची दुरुस्ती प्रलंबित असतानाच या प्रकल्पाच्या भिंतीवर मोठमोठी वृक्ष वाढली असून मूळ खोलवर जाऊन प्रकल्पाच्या भिंतीला धोका उद्भवण्याची भीती आहे. त्याची दखल घेऊन झुडपे तोडण्यासह प्रकल्पाची तात्पुरती दुरुस्ती करण्याची मागणी या प्रकल्पावर अवलंबून असलेले शेतकरी करीत आहेत.