फवारणीसाठी न्यावे लागते घरूनच पाणी !
By Ram.deshpande | Updated: July 26, 2017 20:24 IST2017-07-26T20:23:49+5:302017-07-26T20:24:00+5:30
कळंबा महाली (वाशिम) : वाशिम तालुक्यातील कळंबा महाली व साखरा परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने अद्यापही शेतकºयांना फवारणी करण्यासाठी घरूनच बैलबंडीवर शेतात पाणी न्यावे लागत आहे.

फवारणीसाठी न्यावे लागते घरूनच पाणी !
ठळक मुद्देकाही भागात अपुरा पाऊस; जलस्त्रोतांत पाणी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबा महाली (वाशिम) : वाशिम तालुक्यातील कळंबा महाली व साखरा परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने अद्यापही शेतकºयांना फवारणी करण्यासाठी घरूनच बैलबंडीवर शेतात पाणी न्यावे लागत आहे.
तीन दिवसांपूर्वी सर्वत्र दमदार पाऊस झाला. यामुळे खरिपाची पिके चांगलीच बहरली आहेत. तथापि, साखरा व कळंबा महाली परिसरातील काही भागात अपुरा पाऊस झाला. त्यामुळे विहिरी किंवा तलाव, जलस्त्रोतांत पाणी नाही. पिकांवर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव झाल्याने किटकनाशकांची फवारणी आवश्यक आहे. फवारणी करण्यासाठी लागणारे पाणी शेतात नसल्याने शेतकºयांना घरूनच बैलबंडीवर पाणी न्यावे लागत आहे.