प्रकल्पात पाणी असूनही भर जहॉगीर येथे दोन दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 05:11 PM2020-12-21T17:11:25+5:302020-12-21T17:12:14+5:30

washim News पुरेशा प्रमाणात जलसाठा असूनही भर जहॉगीर येथे ग्रामपंचायततर्फे दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

Water supply at Bhar Jahagir for two days despite water in the project | प्रकल्पात पाणी असूनही भर जहॉगीर येथे दोन दिवसाआड पाणीपुरवठा

प्रकल्पात पाणी असूनही भर जहॉगीर येथे दोन दिवसाआड पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देजलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठ्याची सोय झाली आहे.प्रकल्पाजवळच जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत विहिर घेण्यात आली.

भर जहॉगीर : प्रकल्पात पुरेशा प्रमाणात जलसाठा असूनही भर जहॉगीर येथे ग्रामपंचायततर्फे दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
भर जहॉगीर येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठ्याची सोय झाली आहे. येथून जवळच असलेल्या मोहगव्हाण लघुसिंचन प्रकल्पाजवळच जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत विहिर घेण्यात आली. यावर्षी पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्याने प्रकल्पात बºयापैकी जलसाठा आहे. विहिरीमध्येदेखील जलसाठा आहे. असे असतानाही गावात दोन दिवसाआड तर कधी-कधी एका दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. दैनंदिन पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी गावकºयांमधून होत आहे.

 
गावकºयांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून एक, दोन दिवसआड पाणीपुरवठा केला जातो. गावात १५०० लोक आहेत. काही भागात आज तर दुसºया भागात उद्या अशा पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. गावात पाणीटंचाई नाही.
- पी.के. चोपडे, सरपंच, भर जहॉगीर

Web Title: Water supply at Bhar Jahagir for two days despite water in the project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.