पक्ष्यांकरीता पाण्याची सुविधा; एक हजार कुंड्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 04:02 PM2019-05-11T16:02:28+5:302019-05-11T16:02:53+5:30

वाशीम येथे  डॉ. रणजीत पाटील व माजी आ. वसंतराव खोटरे यांच्याहस्ते पशुपक्षांकरीता कुंडीच्या वितरण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येवून त्यांना कुंडी प्रदान करण्यात आली.

Water supply for birds; Distribution of one thousand kundis | पक्ष्यांकरीता पाण्याची सुविधा; एक हजार कुंड्यांचे वितरण

पक्ष्यांकरीता पाण्याची सुविधा; एक हजार कुंड्यांचे वितरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  गत १४ वषार्पासून सामाजिक कार्यकर्ते तरूण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी व बेटी बचाव बेटी पढावचे संयोजक डॉ. दिपक ढोके जिल्ह्यात व शहरात रखरखत्या उन्हयात पशुपक्षांकरीता पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून एक हजार कुंडीचे वितरण करतात. सोमाणी व डॉ. ढोके यांचा हा उपक्रम प्रेरणादायी असून हीच खरी जीवदया व ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. वाशीम येथे  डॉ. रणजीत पाटील व माजी आ. वसंतराव खोटरे यांच्याहस्ते पशुपक्षांकरीता कुंडीच्या वितरण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येवून त्यांना कुंडी प्रदान करण्यात आली. यावेळी सोमाणी व ढोके यांनी या उपक्रमाची माहिती डॉ. पाटील यांना दिली. यावेळी धिरज शर्मा, पंकज गडेकर, शिक्षक प्रणव बोलवार, गजानन गायकवाड, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील,सौ. शकुंतलाबाई ढोके,  डॉ. निता ढोके, अनुज , आयुष ,प्रा. गजानन खंदारे, पंकज गाडेकर, राजकुमार बोनकिले, अमोल काटेकर, नितीन अग्रवाल, नितीन काळे, सौ. सुरेखा ढगे, विजय ढगे, संदिप पिंपळकर, धनंजय रणखांब, वैभव रणखांब, मयुर वाढेकर, समवेत मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. पाटील यांनी सोमाणी यांचे कार्य हे जैन संताप्रमाणे असल्याचे सांगीतले. सामाजिक कार्यकर्ते सोमाणी  व डॉ. ढोके यांनी विविध गावात भेटी दरम्यानही कुंडयाचे वितरण केले. सोबतच बेटी बचाव , बेटी पढाव अंतर्गत गिर्डा, मानोरा येथील कु. रोशनी पवार व अडगाव हजारे येथील चार मुलींना भेट देवून मायेची उब दिली आहे.
 
गडकरी व उज्वल निकम यांनी केले होते उदघाटन
गत १४ वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे विविध मान्यवरांचे हस्ते दरवर्षी उदघाटनक करण्यात  येते . यापूर्वी या उपक्रमाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सुप्रसिध्द सरकारी विधिज्ञ उज्वल निकम यांच्याहस्ते करण्यात आले होते. त्यांनीही या उपक्रमाची प्रशंसा करीत ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले होते.

Web Title: Water supply for birds; Distribution of one thousand kundis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.