पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:31+5:302021-01-08T06:12:31+5:30
............ अनसिंगमध्ये अतिक्रमण पुन्हा वाढले अनसिंग : वाशिम तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनसिंग येथे ठिकठिकाणी अतिक्रमण ...
............
अनसिंगमध्ये अतिक्रमण पुन्हा वाढले
अनसिंग : वाशिम तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनसिंग येथे ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. यामुळे वाहतूक प्रभावित होण्यासोबतच रहदारी वारंवार विस्कळीत होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी अतुल ताठे यांनी गुरुवारी ग्रामसेवकाकडे केली.
................
रस्ते दुरुस्तीसाठी २० कोटींची गरज
रिसोड : तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी किमान २० कोटी रुपये निधी अपेक्षित असून तो मंजूर करावा, अशी मागणी आमदार अमित झनक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली होती. हा विषय मार्गी लागण्याचे संकेत झनक यांनी दिले आहेत.
...................
रिक्त पदांमुळे कामकाजाचा खोळंबा
मानोरा : तलाठी, वैद्यकीय कर्मचारी, ग्रामसेवक, पशुधन विभागातील कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे होण्यास विलंब होत आहे. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी आसाराम काळे यांनी तहसीलदारांकडे बुधवारी केली.
....................
मालेगाव येथील वाहतूक विस्कळीत
मालेगाव : येथील पोलीस स्टेशनसमोरील बसथांब्यावर ऑटोचालक त्यांची वाहने कुठेही थांबवितात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढत आहे. याकडे वाहतूक विभागाने लक्ष देण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे परमेश्वर खोटे यांनी मंगळवारी वाहतूक निरीक्षकांकडे केली आहे.
...................
खासगी वाहनांमुळे एस.टी.ला फटका
वाशिम : शहरातील बसस्थानकापासून थोड्या अंतरावर खासगी वाहने उभी राहून प्रवाशांची पळवापळवी करीत आहेत. यासह वाशिम ते अकोला या मार्गावरही खासगी वाहनांची संख्या वाढल्याने एस.टी.ला प्रवासी मिळणे कठीण झाल्याचे दिसून येत आहे.