जुने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:49 AM2021-09-17T04:49:49+5:302021-09-17T04:49:49+5:30
.............. मालेगाव बसस्थानक घाणीच्या विळख्यात वाशिम : तालुका मुख्यालय असलेल्या मालेगाव येथे काही वर्षांपूर्वी तहसील कार्यालयानजीक प्रशस्त जागेमध्ये नवे ...
..............
मालेगाव बसस्थानक घाणीच्या विळख्यात
वाशिम : तालुका मुख्यालय असलेल्या मालेगाव येथे काही वर्षांपूर्वी तहसील कार्यालयानजीक प्रशस्त जागेमध्ये नवे बसस्थानक उभारण्यात आले; मात्र त्याठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. वाशिम आगारांतर्गत मालेगावचा कारभार पाहिला जात असून सुविधा पुरविण्याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
...................
वाहने मिळाल्याने रात्रगस्त वाढली
वाशिम : जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वी नवी दुचाकी वाहने समाविष्ट करण्यात आली. यामुळे विशेषत: रात्रगस्तीवर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची सोय झाली आहे तसेच रात्रीच्या सुमारास गस्त वाढविण्यात आल्याने भुरट्या चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांवरही बहुतांशी नियंत्रण मिळाल्याचे दिसत आहे.
...............
शेकडो शेतकरी मदतीपासून वंचित
वाशिम : जिल्ह्यातील मेडशी (ता. मालेगाव) परिसरात गतवर्षी परतीच्या पावसामुळे हजारो एकरावरील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असताना अनेकांना अद्यापपर्यंत शासनस्तरावरून मदत मिळालेली नाही. याकडे प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.
..............
बीएसएनएलची सेवा खंडित
वाशिम : प्रामुख्याने प्रशासकीय कार्यालयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बीएसएनएल दूरध्वनीची सेवा अधूनमधून खंडित होत असल्याने अधिकारी, कर्मचारी वैतागले आहेत. सेवा सुरळीत ठेवण्याची मागणी होत आहे.