मंगरूळपीर शहरातील वार्ड क्रमांक एकमधील पाणीपुरवठा अनियमित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 02:42 PM2018-09-16T14:42:42+5:302018-09-16T14:43:01+5:30
मंगरूळपीर : शहरातील वार्ड क्रमांक एकमधील काही भागात नळाचे पाणी नियमित येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
नागरिकांची गैरसोय : आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : शहरातील वार्ड क्रमांक एकमधील काही भागात नळाचे पाणी नियमित येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नादुरूस्त असलेले व्हॉल्व बदलून नळपाणीपुरवठा योजना पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांनी शनिवारी नगर परिषद तसेच तहसिल कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली.
मंगरूळपीर शहरातील मठ मोहल्ला आणि गवळीपुरा येथील रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मंगरुळपीर नगर परिषद हद्दीतील वार्ड क्रमांक एकमध्ये नगर परिषदेची नळ जोडणी असून, दरवर्षी नागरिकांकडुन पाणी कराचा भरणाही केला जातो. तरीही दोन वर्षापासून वार्ड क्रमांक एकमधील काही भागात पिण्याचे पाणी मिळत नाही. यासंदर्भात संबंधित विभागाकडे तक्रारही करण्यात आली होती. परंतु कुठलीह उपाययोजना प्रशासनाकडुन करण्यात आली नाही. नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेणे शक्य नसून, वार्ड क्रमांक एकमधील त्या भागातील हातपंपही सुरु नाहीत. त्यामुळे दुरवरुन पाणी आणावे लागत आहे. नियमित कर भरणा करुनही पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकउे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. याकडे तहसिल प्रशासनाने लक्ष देऊन नगर परिषदेला सूचना द्यावी, अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली. पाणीपुरवठा पूर्ववत झाला नाही तर नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. निवेदनावर मोहम्मद भुरीवाले, रमजान नौरंगाबादी, इमाम भवानीवाले, मोहम्मद चौधरी,अकबर नंदावाले, मुक्तार पप्पुवाले, कालु भुरीवाले आदींच्या स्वाक्षरी आहेत.