स्वखर्चातून पाईप लाईन टाकून मोहजा इंगोले ग्रामस्थांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 05:03 PM2018-02-18T17:03:42+5:302018-02-18T17:06:16+5:30

 रिसोड: गावातील पाणी टंचाई व त्यासाठी होत असलेली ग्रामस्थांची भटकंती पाहता गावातील धनश्यामने स्वत:च्या विहिरीवरुन स्वखर्चाने घरपोच मोफत कनेक्शन देवून ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न मिटविला.

Water supply to Mohajo Ingole villagers | स्वखर्चातून पाईप लाईन टाकून मोहजा इंगोले ग्रामस्थांना पाणीपुरवठा

स्वखर्चातून पाईप लाईन टाकून मोहजा इंगोले ग्रामस्थांना पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देमोहजा इंगोले या गावात आजपर्यत कोणतीही शासकीय पाणीपुरवठा योजना न आल्याने या गावातील वार्ड क्रमांक दोन मधील झोपडपट्टी भागातील साठ कुटूंब हे पाण्यापासून  वंचित होते .सरपंच घनशाम मापारी यांनी स्वखर्चातुन स्वतच्या शेतातील विहीरीवर तीन हॉर्स पावरची पाण्याची मोटर बसवून विहीरीसाठी स्वतंत्र चार वेगवेगळया पाईप लाईन टाकून झोपडपट्टी मधील साठ कुटूबांच्या घरात स्वतंत्र नळ कनेक्शन दिले. पाईपलाईनचे उद्घाटन गजानन महाराज यांच्या प्रकटदिनी तालुक्याचे तहसिलदार राजू सुरडकर यांच्याहस्ते केले.

- शितल धांडे

 रिसोड: समाजात कोण काय उपक्रम हाती घेईल सांगता येत नाही. सामाजिक  कार्यक्रमाचा वसा अंगी असला की सर्व कार्य साध्य असतात. गावातील पाणी टंचाई व त्यासाठी होत असलेली ग्रामस्थांची भटकंती पाहता गावातील धनश्यामने स्वत:च्या विहिरीवरुन स्वखर्चाने घरपोच मोफत कनेक्शन देवून ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न मिटविला. त्यांच्या या कार्याचे गावकºयांसह जिल्हयातील अनेक गावांमध्ये कौतूक केल्या जात आहे.

रिसोड तालुक्यातील मोहजा इंगोले येथील रहिवासी तथा युवा सरपंच धनश्याम मापारी सरपंच होण्याआधिपासूनच समाजकार्यात अग्रेसर आहेत. त्यांच्यावर ग्रामस्थांनी आता सरपंचाची जबाबदारी टाकल्याने ते यशस्वी राबविण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहेत. त्यातीलच हा एक उपक्रम असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  घनशाम मापारी यांनी सामाजिक दायित्वतेच्या भावनेतुन गावातील साठ कुटूंबाची पाण्याची  कायमस्वरुपी मोफत पाणी पुरवठयाची सोय करुन दिल्याने नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबली आहे.  रिसोड तालुक्यातील मोहजा इंगोले या गावात आजपर्यत कोणतीही शासकीय पाणीपुरवठा योजना न आल्याने या गावातील वार्ड क्रमांक दोन मधील झोपडपट्टी भागातील साठ कुटूंब हे पाण्यापासून  वंचित होते . या कुटूंबातील सर्व लोक हे  गोरगरीब असून त्यांचा दैनदिन शेतमजुरीवर उदरनिर्वाह अंवलबून आहे . या कुटूंबाचा सर्वाधिक रोजचा वेळ हा गावाजवळ असलेल्या घनशाम मापारी यांच्या शेतातून पाणी आणण्यासाठी जात होता.  या लोकांची महत्वपुर्ण पिण्याच्या पाण्याची रोजची अडचण लक्षात घेता सरपंच घनशाम मापारी यांनी स्वखर्चातुन स्वतच्या शेतातील विहीरीवर तीन हॉर्स पावरची पाण्याची मोटर बसवून विहीरीसाठी स्वतंत्र चार वेगवेगळया पाईप लाईन टाकून झोपडपट्टी मधील साठ कुटूबांच्या घरात व्दारपोच स्वतंत्र नळ कनेक्शन दिले. याासाठी त्यांना लाख रुपयांच्या जवळपास खर्चही झाला. विशेष म्हणजे दररोज सकाळी घनशाम मापारी हे स्वता: शेतात जावून सकाळी सात ते आठ या वेळेत या कुटूंबाना पाणीपुरवपठा करतात . मापारी यांच्या या विधायक कार्यामुळे पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होत आहे. मापारी यांनी पाणीपुरवठा पाईपलाईनचे उद्घाटन गजानन महाराज यांच्या प्रकटदिनी तालुक्याचे तहसिलदार राजू सुरडकर यांच्याहस्ते केले. यावेळी विविध मान्यवरांसह  ग्रामस्थांची उपस्थिती लाभली होती.

गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे  भूजल पातळीत मोठया प्रमाणात घट झाली आहे. याचा फटका अनेक गावांना बसला असून तीव्र पाणी टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. मोहजा येथेही अशीच परिस्थिती होती. कामे धंदे सोडून ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असल्याचे दिसल्याने विचार आला व माझया हाताने हे पुण्यांचे कर्म झाले.

- घनश्याम मापारी, मोहजा इंगोले.

Web Title: Water supply to Mohajo Ingole villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.