बिबखेडची पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:34 PM2019-05-21T18:34:36+5:302019-05-21T18:35:27+5:30

रिसोड (वाशिम : सन २०१८-१९ मध्ये स्मार्ट ग्राम ठरलेल्या बिबखेडा येथील नागरिकांची पाण्यासाठी पायपिट सुरू आहे.

Water supply scheme for Bibbehed pending | बिबखेडची पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात

बिबखेडची पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात

Next

- विवेकानंद ठाकरे 
 
रिसोड (वाशिम : सन २०१८-१९ मध्ये स्मार्ट ग्राम ठरलेल्या बिबखेडा येथील नागरिकांची पाण्यासाठी पायपिट सुरू आहे. आठ वर्षांपासून येथील पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात असल्याने याचा जबर फटका नागरिकांना बसत आहे. 
बिबखेडा हे पुनर्वसित असून, येथील पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्याची जबाबदारी ही लघु पाटबंधारे विभाग वाशिम यांच्यावर आहे. आठ वर्षापुर्वी बिबखेडा येथे जलकुंभाचे काम अर्धवट करण्यात आले आहे. तेव्हापासून सदर काम जैसे थे आहे. पाणीपुरवठाकरिता पाईपलाईनच्या कामाचे तीनतेरा वाजले आहे. तेथील पाणीपुरवठा योजनेचे काम व्यवस्थित झाले नाही. पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत नसल्यामुळे ग्रामस्थांना दोन किलोमीटर अंतरावर पायपिट करून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. बहुतांश ग्रामस्थांकडे बोअरवेलची व्यवस्था आहे. जलपातळीत घट झाल्याने बोअर कोरड्या पडल्या आहेत. काही मोजक्याच बोअरला पाणी आहे.  गावात टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, संपूर्ण गावकºयांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने गावकºयांची पाण्यासाठी पायपिट सुरू आहे. काही जण गावातील जलस्त्रोतावरून तर काही जणांना शेतातून बैलबंडीव्दारे पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. 
आठ वर्षापासून पाण्याची टाकी शोभेची वस्तू बनली आहे. पाणीपुरवठा योजनेचा निधी सुद्धा काढण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात मात्र गावकºयांना पाण्याचा थेंब सुद्धा या योजनेमधून मिळाला नाही हे विशेष. याप्रकरणी सविस्तर चौकशी झाल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
बिबखेडा पाणीपुरवठा योजनेसंदर्भात संबंधित कंत्राटदारास नोटीस बजावण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे.
- शिवाजी जाधव 
कार्यकारी अभियंता, लघू पाटबंधारे विभाग वाशिम

Web Title: Water supply scheme for Bibbehed pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.