मानोरा तालुक्यातील २८ गावे पाणी पुरवठा योजना १० दिवसापासुन बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 02:05 PM2018-06-29T14:05:25+5:302018-06-29T14:08:24+5:30
मानोरा : मानोरा शहरासह तालुक्यातील २८ गावांना पाणी पुरवठा करणारी २८ गावे प्रादेशीक योजना भुली फाटट्यावर लिंकेज असल्यामुळे उर्वरीत गावासाठी गेल्या १० दिवसापासुन बंदच आहे.
मानोरा : मानोरा शहरासह तालुक्यातील २८ गावांना पाणी पुरवठा करणारी २८ गावे प्रादेशीक योजना भुली फाटट्यावर लिंकेज असल्यामुळे उर्वरीत गावासाठी गेल्या १० दिवसापासुन बंदच आहे. पाण्यासाठी नागरिकांचे हाल बेहाल होत आहे. योजना पुर्ववत करण्यासाठी प्राधीकरणाचे प्रयत्न कासवगतीने सुरु आहे.
मानोरा शहरासह तालुक्यासाठी वरदान ठरलेली २८ गावे पाणी पुरवठा योजना गेल्या १० दिवसापासुन बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने विहीरीला नव्या पाण्याची सुरुवात झाली आहे. आलेले नवे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. प्रादेशीक योजना या ना त्या कारणाने नेहमीच बंद राहत असल्याने नागरिकांना नाइलाजास्तव दुषीत पाण्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना आजार बळावत आहे. तत्कालीन कर्मचारी गंगाधर ढोरे हे गत महिन्यात सेवानिवृत्त झाले, तेव्हापासुन या योजनेला कुणी वालीच राहिला नाही. असे दिसुन येत आहे. या संदर्भात शाखा अभियंता खराटे यांचेशी संपर्क साधला असता त्यांचे दोन्हीही नंबर बंद होते.
भुली फाट्यावर लिकेज असल्यामुळे ते पुर्ववत करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. आजच ते काम पूर्ण होवुन उद्या ही योजना पुर्ववत करण्यात येईल. -गणेश भोगावडे, सहा.कार्यकारी अभियंता जिवन प्राधीकरण, कारंजा.