पाणीपुरवठा योजना प्रभावित; पावसाळ्यात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:39 AM2021-07-19T11:39:04+5:302021-07-19T11:39:23+5:30
Water scarcity in the rainy season : नागरिकांना भरपावसाळ्यातही विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे वतीने तालुक्याला २८ गावे नळ योजना राबविली जात आहे. परंतु, या ना त्या कारणाने पाणीपुरवठा नेहमीच बंद राहत असल्यामुळे नागरिकांना भरपावसाळ्यातही विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे.
तालुक्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून अठ्ठावीस गावे पाणीपुरवठा योजना कार्यन्वित आहे. सुरुवातीला अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असल्यामुळे रस्ता कामात पाईप फुटण्याच्या कारणावरून योजना बंद राहायची. यात संपूर्ण दोन वर्ष गेले. या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले तरी सुध्दा ही नळ योजना पूर्ण सुरळीत झाली नाही.
आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाणीपुरवठा ठप्प असतो. सध्या पाणीपुरवठा योजना बंद आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकाना शेतीचे कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षित आहे.