अखेर राजूरा गावात पोहचले पाण्याचे टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 06:26 PM2019-05-26T18:26:08+5:302019-05-26T18:26:14+5:30

राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील राजूरा येथे १७ मे रोजी टँकर मंजूर झालेले आहे. मात्र, टँकर गावात पोहचले  नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत २६ मे रोजी पाण्याचे टँकर गावात पोहचले.

Water Tankers Reaching Rajura Village | अखेर राजूरा गावात पोहचले पाण्याचे टँकर

अखेर राजूरा गावात पोहचले पाण्याचे टँकर

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील राजूरा येथे १७ मे रोजी टँकर मंजूर झालेले आहे. मात्र, टँकर गावात पोहचले  नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत २६ मे रोजी पाण्याचे टँकर गावात पोहचले.
राजूरा येथे दरवर्षी तिव्र पाणीटंचाई निर्माण होते. परिसरातील जलस्त्रोत आटल्याने गावकºयांना दूरवरून पाणी आणण्याची कसरत करावी लागते. राजूरा येथील पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामपंचायतसह गावकºयांनी वारंवार वरिष्ठ प्रशासनाकडे केली आहे. मात्र, अद्याप या मागणीची दखल घेण्यात आली नाही. परिणामी, गावकºयांना उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहिदिशा भटकंती करावी लागते. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर स्वरुपाचा होऊन जातो. यावर्षीदेखील राजूरा येथील तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. उन्हाळ्याला सुरूवात होताच, तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. तेव्हापासून १५ मे पर्यंत गावकºयांना पाण्यासाठी पायपिट करावी लागली. १७ मे रोजी टँकरच्या प्रस्तावाला वरिष्ठ स्तरावर मंजूरी मिळाल्याने गावात टँकरचे पाणी येईल, या आशेवर असलेल्या गावकºयांचा पुरता भ्रमनिरास झाला. टँकर मंजूर असतानाही गावात टँकर पोहचले नसल्यासंदर्भात लोकमतने २० मे तसेच २६ मे रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत २६ मे रोजी राजूरा येथे पाण्याचे टँकर पोहचलेआहे. गावातील विहिरीत पाणी सोडण्यात आले असून, येथून गावकºयांनी पाणी भरले. टँकरच्या फेºया नियमित सुरू ठेवाव्या, अशी अपेक्षा गावकºयांनी व्यक्त केली.

Web Title: Water Tankers Reaching Rajura Village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.