वाशिम जिल्ह्यात पाणीनमुने तपासणी मोहिम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 05:32 PM2019-04-02T17:32:12+5:302019-04-02T17:32:43+5:30
वाशिम : नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून गावपातळीवर पाणीनमुने तपासणी मोहिम राबविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून गावपातळीवर पाणीनमुने तपासणी मोहिम राबविली जात आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडू नये म्हणून शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींना दिलेले आहेत. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी पाणी नमुने तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. जलस्त्रोताचे पाणी नमुने घेऊन सदर नमुने रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. या तपासणीनंतर सदर जलस्त्रोताचे पाणी पिण्यास हानीकारक असल्यास तसा फलक त्या ठिकाणी लावण्याचे निर्देशही प्रशासनाने ग्राम पंचायतीला दिलेले आहेत. हातपंप, विहिर व अन्य जलस्त्रोतांचे पाणी नमुने घेतले जात आहेत. या कामात दिरंगाई करणाºयांविरूद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला.