वृक्ष जगविण्यासाठी हंड्याने पाणी; टनका ग्रामस्थांचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 03:41 PM2019-07-20T15:41:53+5:302019-07-20T15:41:58+5:30
पावसाने दडी मारल्याने वृक्ष कोमेजून जावू नये याकरिता हंडयाने पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तालुक्यातील टनका ग्रामपंचायतच्या सरपंचाने आधी ग्रामस्थांनी वृक्ष लावण्याचा पुरावा दाखविल्याशिवाय कोणताही दाखला मिळणार नसल्याचा उपक्रम राबविला. यामुळे मोठया प्रमाणात गावात वृक्षारोपण झाले. रस्त्याच्या दुतर्फा झाडे व ट्रीगार्ड लागलेत. पावसाने दडी मारल्याने वृक्ष कोमेजून जावू नये याकरिता हंडयाने पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतला. असून या उपक्रमाचे नागरिकांतून कौतूक केल्या जात आहे.
वाशिम तालुकयातील छोटेसे परंतु नवनविन उपक्रम राबवून चर्चेत राहणारी ग्रामपंचायत म्हणून टनका ओळखल्या जाते. तेथील सरपंच राध्येश्याम गोदारा यांच्या संकल्पनेतून नवनविन उपक्रम राबविण्यात येत आहे. पावसाळयात जाणवणारी पाणी टंचाईवर तोडगा असो की जास्तीत जास्त वृक्षारोपण व्हावे यासाठी राबविल्या उपक्रमाचे जिल्हयात स्वागत करण्यात आले. सद्यस्थितीत पावसाने दडी मारली आहे. शेतकºयांचे पीके संकटात आहेत तर ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गंत करण्यात आलेले वृक्षही संकटात आहेत. संपूर्ण गावकºयांनी केलेली मदत व्यर्थ जावू नये याकरिता सरपंच राध्येशाम गोदारा यांनी लावण्यात आलेल्या झाडांना हंडयात पाणी भरुन देत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतूक केल्या जात आहे. या कार्याला गावकरयांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. टनका ग्रामपंचातयच्यावतिने जवळपास ९०० झाडे लावण्यात आली आहे. या सर्व झाडांना जनावरांपासून वाचविण्यासाठी आकर्षक व रस्त्यावरुन जातांना सर्वत्र हिरवळ दिसेल असे टिगार्ड उभारण्यात आले आहे. कमी खर्चात खूप छान टिगार्ड तयार करुन वृक्ष वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.