सोनल प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय; पाणीपुरवठा योजनेच्या वाहिनीतून पाण्याची गळती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 05:07 PM2019-05-25T17:07:32+5:302019-05-25T17:08:47+5:30
वाशिम : सोनल प्रकल्पावरून टाकण्यात आलेल्या आठ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी ‘लिकेज’ असून त्यातून बारोमास पाण्याची गळती सुरू असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सोनल प्रकल्पावरून टाकण्यात आलेल्या आठ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी ‘लिकेज’ असून त्यातून बारोमास पाण्याची गळती सुरू असते. हा प्रकार प्रखर उन्हाळ्यात दिवसांत सद्याही सुरू असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
मालेगाव तालुक्यातील सोनल मध्यम सिंचन प्रकल्पावरून आठ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. बोराळानजीक असलेल्या कार्ली या गावाच्या फाट्यापासून गावाकडे जाताना लागणाºया नदीवर मोठा पूल असून आसपासच्या परिसरातून ही जलवाहिनी गेलेली आहे. काहीठिकाणी जलवाहिनीला लिकेज झाल्याने पाण्याची गळती सुरू आहे. बाराही महिने सुरू असणाºया या प्रकारामुळे सोनल प्रकल्पातील कोट्यवधी लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. काहीठिकाणी अवैधरित्या जलवाहिनीला छीद्र पाडून पाण्याचा गैरवापर केला जात असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, यावर्षी एकीकडे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना दुसरीकडे होत असलेला पाण्याचा अपव्यय रोकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण लक्ष पुरवत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
आठ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या वाहिनीला अनेक ठिकाणी ‘लिकेज’ असून ते दुरूस्त करण्याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करित आहे. यामुळे बाराही महिने पाण्याची गळती होवून कोट्यवधी लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.
- नामदेव नरहरी वानखेडे
उपसरपंच, कार्ली ग्रामपंचायत