२८ गावे पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 08:09 PM2017-10-05T20:09:08+5:302017-10-05T20:09:54+5:30
तळप बु.: तळप बु. समाविष्ठ असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण २८ गावे पाणी पुरवठा याजेनेची थकीत पाणीपट्टी वसुली करण्याबाबत मजीप्राकडुन कठोर उपाय योजना केल्या जात नाही. परिणामी सदरहून योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तसेही थकीत पाणी पट्ीचे कारण दाखवुन यापूर्वी एकदा ही पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळप बु. (वाशिम): तळप बु. समाविष्ठ असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण २८ गावे पाणी पुरवठा याजेनेची थकीत पाणीपट्टी वसुली करण्याबाबत मजीप्राकडुन कठोर उपाय योजना केल्या जात नाही. परिणामी सदरहून योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तसेही थकीत पाणी पट्ीचे कारण दाखवुन यापूर्वी एकदा ही पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आली होती.
तळप बु. सह मानोरा तालुक्यातील २८ गावातील पाणी समस्या कायम स्वरुपी निकाली काढण्याच्या उद्देशाने सन २००५ मध्ये मजीप्राची २८ गावे पाणी पुरवठा योजना असित्वात आली.परंतु खरच आज रोजी या २८ गावातील पाणी समस्या निकाली निघाली का? हा मात्र प्रश्नच आहे. २८ गावाकरिता अस्तित्वात असलेली ही योजना आज रोजी एकुण १४ गावापुरतीच मर्यादीत झाली आहे. आणि या १४ गावातील ही पाणी पुरवठा १ आॅक्टोंबर पासुन बंद करण्याचे पत्र मजीप्राने संबंधीत ग्रामपंचायतींना दिले असल्याने कधीही योजना बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्राहकाकडून पाणीपट्टी वसुली होत नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु ही पाणीपट्टी वसुल व्हावी अशी मजीप्राची इच्छाच नाही. तळप बु. हे गाव सुध्दा २८ गावे पाणी पुरवठा योजनेमध्ये समाविष्ट आहे. येथे अनेक नळ ग्राहकाकडे दोन दोन वर्षापासून पाणी पट्टीची थकीत रक्कम आहे. अनेकांचे अवैध नळ कनेक्शन आहेत, मात्र त्यावर मजीप्राकडून कारवाई केल्या जात नाही. परिणामी मजीप्राच्या गलथान कारभारामुळे व नागरिकांच्या पाणीपट्टी न भरण्याच्या वृत्तीमुळे ही चांगली व आवश्यक असलेली योजना बंद पडत आहे. मजीप्राने स्थानिक ग्रामपंचायती तेथील पाणी पुरवठा समित्या सोबत घेवुन पाणीपट्टी वसुलीकरिता कठोर उपाय योजना,करणे गरजेचे आहे. अन्यथा तालुक्यातील २८ गावाकरिता वरदान असलेली ही योजना कायमची बंद पडणार हे मात्र निश्चित आहे.