आम्ही ग्रामरक्षक अभियानांतर्गत १५ गावांत लसीकरणाविषयी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:43+5:302021-06-29T04:27:43+5:30
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा कारंजाकडून राबविण्यात आलेल्या अभियानात ८ दिवसांत १५ गावांमध्ये लसीकरण जनजागृती, मास्क वाटप व गाव ...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा कारंजाकडून राबविण्यात आलेल्या अभियानात ८ दिवसांत १५ गावांमध्ये लसीकरण जनजागृती, मास्क वाटप व गाव निर्जंतुकीकरण आदी विषयांवर जनजागृती करण्यात आली. तालुक्यातील कामठवाडा, गंगापूर, दादगाव, वाई, मुरबी, दोनद, तपोवन, इंझोरी, उंबर्डा, मनभा, सोहळ, आमगव्हान, पोहा, तुळजापुर, रूद्राला, तसेच कारंजा शहरातील बायपास व झोपडपट्टी परिसरात जनजागृती व गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी अभाविप कारंजा शाखेचे नगर मंत्री गौरव साखरकर, सहमंत्री आनंद मापारी, विक्की बारबोले, नेहा लोखंडे, साक्षी पापळकर, अंकुश जाधव, अभी लोखंडे, प्रेम राठोड, रुद्राक्ष जोशी, ओम शेलवंते, ओम रेवाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी अमरावती महानगरचे भाग सहमंत्री निलय बोन्ते व प्रांत वस्तगृह प्रमुख प्रशांत राठोड सुद्धा ह्या अभियानात उपस्थित होते. ह्या अभियानात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा विस्तारक कौस्तुभ मोहदरकर यांनी केली आहे.
----------------
लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न
खेडेगावातील लोकांमध्ये लसीकरणाबाबत वेगवेगळे गैरसमज निर्माण झाले आहेत. गावकऱ्यांच्या मनात कोविड लसीकरणाबाबत असलेले गैरसमज हा दूर करण्याचा प्रयत्न अभाविपच्या मी ग्राम रक्षक अभियानाच्या माध्यमातून करण्यात आला. यासाठी गावागावांत जाऊन लसीकरणाबाबत सत्यता व त्याचे परिणाम सांगण्यात आले.