संपत्ती, यूपीएससीमार्फत झालेली निवड, अवाजवी मागण्या; वादावर IAS पूजा खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 01:50 PM2024-07-11T13:50:33+5:302024-07-11T13:52:23+5:30

गेल्या काही दिवसापासून आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात सापडल्या आहेत.

Wealth, selection through UPSC, excessive demands IAS Pooja Khedkar's first reaction to the controversy | संपत्ती, यूपीएससीमार्फत झालेली निवड, अवाजवी मागण्या; वादावर IAS पूजा खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया

संपत्ती, यूपीएससीमार्फत झालेली निवड, अवाजवी मागण्या; वादावर IAS पूजा खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसापासून आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात सापडल्या आहेत. त्यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावले, स्वतःच्या खासगी गाडीवर लाल दिवा मिरवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगूनही पाहिले. मात्र तरीही वर्तणुकीत बदल झाला नाही. यानंतर त्यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, आता त्यांची संपत्ती, यूपीएससीमार्फत झालेली निवड यामुळे त्या आणखी चर्चेत आल्या आहेत. दरम्यान, आता या चर्चांवर पूजा खेडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

'दिवा विझताना जास्त फडफडतो, तशी महायुती सरकारची अवस्था'; जयंत पाटलांचा टोला

 पूजा खेडकर या आज वाशिम कार्यालयात रुजू झाल्या आहेत. या वादानंतर पूजा खेडकर आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या. या वादावर बोलताना खेडकर म्हणाल्या, सॉरी, आपण यावर बोलण्यास अधिकृत व्यक्ती नाही. सरकारी नियमानुसार या प्रकरणावर मला काहीही परवानगी नाही. त्यामुळे सॉरी , मी काहीही बोलणार नाही. मी आज वाशिममध्ये रुजू झाली आहे, असंही पूजा खेडकर म्हणाल्या.

पूजा खेडकरांच्या अधिक मागण्या

भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. जिल्ह्याचे कामकाज कसं चालतं याची माहिती त्यांना घ्यावी लागते. वेगवेगळ्या विभागात काम करावं लागतं आणि या कामाचा अनुभव आल्यानंतरच त्यांना नियुक्ती देण्यात येते.

प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होण्याच्या आधीच या मॅडमनी जिल्हाधिकाऱ्यांना व्हाट्सअपवर मेसेज पाठवत गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे म्हणत मागणी केली.. जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिस शेजारीच मलाही ऑफिस पाहिजे अशी मागणी केली. 

जिल्हाधिकाऱ्यांनीच प्रोव्हेशनवर असणाऱ्या पूजा खेडकर यांची वर्तणूक प्रशासकीय अधिकाऱ्याला शोभेल अशी नाही म्हणत तक्रार केली होती.. आणि त्या तक्रारीची दखल घेत खेडकरांची तडकाफडकी वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली .

Web Title: Wealth, selection through UPSC, excessive demands IAS Pooja Khedkar's first reaction to the controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.