ग्रामविकास योजनेविषयी वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:33+5:302021-07-08T04:27:33+5:30
भारत सरकारच्या खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या विविध ग्रामविकास योजना व त्यांची यशस्वी अंमलबजावणी या विषयावर अमरावती विभागातील सरपंच व ...
भारत सरकारच्या खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या विविध ग्रामविकास योजना व त्यांची यशस्वी अंमलबजावणी या विषयावर अमरावती विभागातील सरपंच व इतर ग्रामीण लोकप्रतिनिधींसाठी हे वेबिनार होणार आहे. यामध्ये एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्रणेते राहुल कराड अध्यक्ष असतील. खादी व ग्रामोद्याेग आयोगाचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशोवर्धन बारामतीकर हे या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील. या वेबिनारमध्ये राष्ट्रीय सरपंच संसद प्रमुख समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाशराव महाले, प्रांत समन्वयक व्यंकटेश जोशी, एमआयटी स्कुल आॅफ गव्हर्नमेंट च्या सहसंचालीका डाॅ. शैलश्री हरीदास व एम आय.टी. शिक्षणसंस्था समूहाचे जनसंपर्क व सामाजिक विभागाचे संचालक रवींद्रनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थित वेबिनार होणार आहे. सरपंच यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अमरावती विभागाचे समन्वयक अभय खेडकर, विभागीय सहसमन्वयक संजय देशमुख यांच्यासह जिल्हा समन्वयकांनी केले आहे.