शेतीच्या बांधावर विवाह सोहळा
By admin | Published: April 25, 2017 08:18 PM2017-04-25T20:18:21+5:302017-04-25T20:18:21+5:30
कारंजा लाड- ग्राम काकडशिवणी येथे शेताच्या बांधावर पार पडलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात ४ जोडपी विवाहबध्द झाले असून त्यापुर्वी महाश्रमदानातुन जलसंधारणाची कामे करण्यात आली.
कारंजा लाड : राज्यात पाणी फाउंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्याला ८ एप्रिलपासून सुरुवात झाली असुन गावागावात श्रमदान केल्या जात आहे. या स्पर्धेअंतर्गत गावागावात वेगवेगळ्या पध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन २५ एप्रिल पासून कारंजा तालुक्यातील ग्राम काकडशिवणी येथे शेताच्या बांधावर पार पडलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात ४ जोडपी विवाहबध्द झाले असून त्यापुर्वी महाश्रमदानातुन जलसंधारणाची कामे करण्यात आली.
आजवर आपण अनेक विवाह समारंभ पाहिले असतील, किंबहुना आतापर्यंत अनेक विवाह समारंभांना आपण उपस्थिती देखील लावली असेल, मात्र आगळ्यावेगळ्या विवाह समारंभाला उपस्थित राहण्याचा योग आयुष्यात क्वचितच येतो. असाच एक आगळावेगळा विवाह सोहळा कारंजा तालुक्यातील ग्राम काकडशिवणी येथे पार पडला. या विवाह सोहळ्याचे आयोजन काकडशिवणी ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय मालवे यांनी केले होते. तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यासहीत परिसरातील नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावुन या विवाह सोहळयाचे साक्षीदार बनले.यापुर्वी सकाळी ७ वाजतापासुन महाश्रमदानाला सुरुवात झाली. श्रमदानातुन आतापर्यंत या गावात ६ शेततळे ,३ जुन्या गावतलावाचे खोलीकरण, ४ एल.बी.एस,३ दगडी कट्टे, १२०० मिटर ची सिसीटी, प्रत्येक घरापुढे शोषखड्डा, वृक्ष लागवडीचे खड्डे या श्ेतीच्या बांध बंदीस्तीचे काम करण्यात आले.