शेतीच्या बांधावर विवाह सोहळा

By admin | Published: April 26, 2017 01:08 AM2017-04-26T01:08:34+5:302017-04-26T01:08:34+5:30

कारंजा लाड- ग्राम काकडशिवणी येथे शेताच्या बांधावर पार पडलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात ४ जोडपी विवाहबध्द झाले असून त्यापुर्वी महाश्रमदानातुन जलसंधारणाची कामे करण्यात आली.

Wedding Ceremony on Agriculture Buildings | शेतीच्या बांधावर विवाह सोहळा

शेतीच्या बांधावर विवाह सोहळा

Next

चार जोडपे विवाहबद्ध : वर-वधूंनी केले बांधावर श्रमदान

कारंजा लाड : राज्यात पाणी फाउंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्याला ८ एप्रिलपासून सुरुवात झाली असुन गावागावात श्रमदान केल्या जात आहे. या स्पर्धेअंतर्गत गावागावात वेगवेगळ्या पध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन २५ एप्रिल पासून कारंजा तालुक्यातील ग्राम काकडशिवणी येथे शेताच्या बांधावर पार पडलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात ४ जोडपी विवाहबध्द झाले असून त्यापुर्वी महाश्रमदानातुन जलसंधारणाची कामे करण्यात आली.
आजवर आपण अनेक विवाह समारंभ पाहिले असतील, किंबहुना आतापर्यंत अनेक विवाह समारंभांना आपण उपस्थिती देखील लावली असेल, मात्र आगळ्यावेगळ्या विवाह समारंभाला उपस्थित राहण्याचा योग आयुष्यात क्वचितच येतो. असाच एक आगळावेगळा विवाह सोहळा कारंजा तालुक्यातील ग्राम काकडशिवणी येथे पार पडला. या विवाह सोहळयात काकडशिवणी येथील उमेश सोळंके यांच राधा पवार यांच्याशी, केशव भोसले यांचा सुषमा पवार यांच्याशी, काकडशिवणी येथील संजय लाहोरकर यांचा मंगरुळपीर येथील रावा ठणठणकार यांच्याशी तर शिरपुर जिल्हा अमरावती येथील ज्ञानेश्वर पवार यांचा पुजा भोसले यांच्याश्ी लग्नगाठी बांधुन विवाहबध्द झालेत. या विवाह सोहळ्याचे आयोजन काकडशिवणी ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय मालवे यांनी केले होते. तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यासहीत परिसरातील नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावुन या विवाह सोहळयाचे साक्षीदार बनले.यापुर्वी सकाळी ७ वाजतापासुन महाश्रमदानाला सुरुवात झाली. श्रमदानातुन आतापर्यंत या गावात ६ शेततळे ,३ जुन्या गावतलावाचे खोलीकरण, ४ एल.बी.एस,३ दगडी कट्टे, १२०० मिटर ची सिसीटी, प्रत्येक घरापुढे शोषखड्डा, वृक्ष लागवडीचे खड्डे या श्ेतीच्या बांध बंदीस्तीचे काम करण्यात आले. २५ एप्रिल रोजी पार पडलेल्या महाश्रमदानात उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, गटविकास अधिकारी डी.बी.पवार, विस्तार अधिकारी साई चव्हाण, नायब तहसीलदार डी.एन.पाचरणे, जिल्हा परिषद सदस्य ज्योतीताई गणेशपुरे, जयपुर ग्रामपंचायतचे सरपंच विजय पाटील काळे, ग्रामसेवक संघटना, रोजगार सेवक संघटना, संगणक चालक संघटना, ग्रामपंचायत शिपाई संघटना, स्थानिक बाबासाहेब धाबेकर विद्यार्थी व शिक्षक तसेच गावकऱ्यांनी केला आहे.

Web Title: Wedding Ceremony on Agriculture Buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.