१५ व्यक्तींच्या उपस्थितीतच उरकावे लागणार लग्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:43 AM2021-05-11T04:43:11+5:302021-05-11T04:43:11+5:30

जिल्ह्यात वाढीव कोरोना चाचण्यांच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी असली तरी रुग्णसंख्येत चढउतार येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू ...

The wedding will have to end in the presence of 15 people! | १५ व्यक्तींच्या उपस्थितीतच उरकावे लागणार लग्न !

१५ व्यक्तींच्या उपस्थितीतच उरकावे लागणार लग्न !

googlenewsNext

जिल्ह्यात वाढीव कोरोना चाचण्यांच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी असली तरी रुग्णसंख्येत चढउतार येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. यापूर्वी लग्न मारंभाला २५ लोकांच्या उपस्थितीचे बंधन होते. आता यामध्ये १० ने संख्या कमी करून केवळ १५ व्यक्तींच्या उपस्थितीतच दोन तासात लग्नसमारंभ उरकावा लागणार आहे. शहरासह ग्रामीण भागात कुठेही बेकायदेशीरररत्या लग्न सोहळा पार पडणार नाही, याची संबंधित ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समितीने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. बेकायदेशीररीत्या लग्न सोहळा आयोजित केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. लग्नसमारंभाचे नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कोरोनामुळे लग्नसमारंभही अडचणीत सापडले असून, काहींनी लग्नसमारंभ पुढे ढकलल्याची माहिती आहे. लग्नसमारंभात १५ पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती राहू नये म्हणून मंगल कार्यालय, ग्रामीण भागात भेटी देण्याचे निर्देशही संंबंधित यंत्रणेला जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

Web Title: The wedding will have to end in the presence of 15 people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.