तीन वाहनांचा विचित्र अपघात; चार जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 05:29 PM2018-07-26T17:29:24+5:302018-07-26T17:29:32+5:30
नागपूरवरून औरंगाबादकडे जाणा-या सिमेंट मिक्सर असलेल्या वाहनाने विरूद्ध दिशेने येणा-या दोन वाहनांना धडक दिल्याने दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना औरंगाबाद ते नागपूर महामार्गावरील किन्हीराजानजीक २६ जुलै रोजी पहाटेच्या ४ वाजताच्या सुमारास घडली.
किन्हीराजा (वाशिम) - नागपूरवरून औरंगाबादकडे जाणा-या सिमेंट मिक्सर असलेल्या वाहनाने विरूद्ध दिशेने येणा-या दोन वाहनांना धडक दिल्याने दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना औरंगाबाद ते नागपूर महामार्गावरील किन्हीराजानजीक २६ जुलै रोजी पहाटेच्या ४ वाजताच्या सुमारास घडली. चालक बाबाजी मसकर (५५), रा. मड (जुन्नर), विशाल मडवे (२५) रा. मड (जुन्नर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
औरंगाबाद ते नागपूर महामार्गावरून एम.एच. ३४ बी.जी. ९९९७ क्रमांकाचे सिमेंट मिक्सर असलेले वाहन औरंगाबादकडे जात होते. त्याचवेळी एम.एच. ०६ जी. ९३०१ क्रमांकाचे पिकअप वाहन व व एम. एच. १४ एफ. टी. ४९६ क्रमांकाचे पीकअप वाहन हे विरुद्ध दिशेने जुन्नर येथून फुले घेऊन नागपूरकडे जात होते. किन्हीराजा गावापासून तीन किमी अंतरावर असेलल्या एका हॉटेलजवळ सिमेंट मिक्सर असलेल्या वाहनाने समोरील दोन्ही पिकअप वाहनांना जबर धडक दिली. यामध्ये एक पिकअप वाहन रस्त्यावरच उलटले तर दुसरे पिकअप वाहन हे रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले.
या अपघातानंतर सिमेंट मिक्सर असलेल्या वाहनाचा चालक व वाहक घटनास्थळावरून पसार झाले. रस्त्याच्या कडेला उलटलेल्या वाहनाचे चालक बाबाजी मसकर (५५), रा. मड (जुन्नर), विशाल मडवे (२५) रा. मड (जुन्नर) हे दोन्ही चालक व वाहक गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी वाशिम येथे हलविण्यात आले. रस्त्यावर उलटलेल्या वाहनाचे चालक गणेश शिंदे (३२) रा. खामगाव व राहुल चकवे (२०) रा. पारगाव हे दोघेही किरकोळ जखमी झाले. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेचा पुढील तपास जउळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार किरण साळवे यांच्या मार्गदर्शनात किन्हीराजा चौकीचे कर्मचारी करीत आहेत.