'बम भोले’च्या गजरात शेलूबाजार येथे कावड यात्रेचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:10 PM2018-08-20T16:10:23+5:302018-08-20T16:11:29+5:30
शेलूबाजार (वाशिम) : श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील शिवाजी नगर शिवभक्त कावड मंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र वाघागड येथील गजानन महाराज गुप्तेश्वर संस्थान येथून जल आणण्यासाठी कावड रवाना झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार (वाशिम) : श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील शिवाजी नगर शिवभक्त कावड मंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र वाघागड येथील गजानन महाराज गुप्तेश्वर संस्थान येथून जल आणण्यासाठी कावड रवाना झाली होती. तेथून २० आॅगस्ट रोजी या कावड यात्रेचे गावात आगमन झाले. त्यानिमित्त ‘बम भोले’च्या गजरात गावातून शिवभक्तांची मिरवणूक काढून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
कावड यात्रेचे गावात आगमन होताच मुख्य चौकात गावातील युवकांनी आतषबाजी करित शिवशंकराच्या गितांवर थिरकत मोठा जल्लोष केला. शिवभक्तांनी जल भरून आणलेल्या कावडीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यामुळे संपूर्ण गाव शिवभक्तीमय झाल्याचे दिसून येत होते. यावेळी पांडूरंग कोठाळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास लांभाडे यांच्यासह गावातील शेकडो शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.