कोपर्डीच्या निकालाचे मालेगांव येथे फटाके फोडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 07:05 PM2017-11-29T19:05:33+5:302017-11-29T19:22:35+5:30
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणाचा बुधवार २९ नोव्हेंबर रोजी निकाल लागला. त्यात तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा मिळाली. या निकालाचे मालेगाव येथे शंभुराजे प्रतिष्ठानच्यावतीने फटाके फोडून स्वागत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणाचा बुधवार २९ नोव्हेंबर रोजी निकाल लागला. त्यात तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा मिळाली. या निकालाचे मालेगाव येथे शंभुराजे प्रतिष्ठानच्यावतीने फटाके फोडून स्वागत करण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. समाजमन हेलावून टाकणाºया या घटनेनंतर दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी सर्वच स्तरातून करण्यात येत होती. या प्रकरणाचा निकाल २९ डिसेंबर रोजी लागला. त्यामधे कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणी आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे, नितीन गोपीनाथ भैलूमे व संतोष गोरख भवाळ या तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे मालेगावातील जुने बस स्थानक परिसरात न्यायालयाच्या निर्णयाचे दुपारी ३ वाजता फटाके फोडून स्वागत करण्यात आले. त्यावेळी अतुल ठाकरे, प्रकाश बोरजे, विक्की सदार, पप्पू देवळे, श्रीकांत कुटे, विशाल मानवतकर, योगेश मानवतकर दिपक कुटे, गणेश पवार, गणेश ठाकरे, प्रशांत ठाकरे, पप्पू अंभोरे, मनोज बोबडे, रवि गायकवाड, केशव सुरुसे, मंगेश गायकवाड, अमित वानखेडे, गजानन बोरचाटे, शुभम इंगळे, सतिश लहाने, देवानंद बोबडे, पप्पू कुटे, सागर अहिर, तेजस आरु, अतुल सोभागे, सुशील सोमटकर, गणेश देवकर, अभी देवकते, दिपक गुडदे, भारत भालेराव आदिंसह शंभुराजे प्रतिष्ठानचे जवळपास १०० सदस्य उपस्थित होते.