राष्ट्रसंतांच्या पालखीचे मंगरुळपीर येथे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:37 PM2018-07-23T14:37:38+5:302018-07-23T14:38:41+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखीचे मंगरुळपीर येथे श्री गुरुदेव  प्रार्थना सभागृह बाबरे ले-आउट येथे येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.

Welcome of rashtransant palkhi in mangrulpir | राष्ट्रसंतांच्या पालखीचे मंगरुळपीर येथे स्वागत

राष्ट्रसंतांच्या पालखीचे मंगरुळपीर येथे स्वागत

Next
ठळक मुद्देसामुदायिक प्रार्थना व ध्यान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संचालन गुरुदेव सेवामंडळाचे अध्यक्ष गोपाल क्षीरसागर यांनी तर आभार जिल्हा सचिव डॉ.सुधाकर क्षिरसागर यांनी केले.


लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज  आश्रम मोझरी येथुन पंढरपुर येथे विठ्ठल दर्शन करिता निघालेल्या वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखीचे मंगरुळपीर येथे श्री गुरुदेव  प्रार्थना सभागृह बाबरे ले-आउट येथे येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
प्रथमत:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणपादुकांचे पुजन जीवन प्रचारक रविंद्र वार्डेकर व मिरा वार्डेकर यांनी केल्यानंतर सामुदायिक प्रार्थना व ध्यान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रविद्र वार्डेकर यांची तर प्रमख अतिथी म्हणुन  अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमचे प्रचार प्रमुख दामोदर पाटील विशेष अतिथी म्हणुन प्रा.सुनिल सपकाळ यांची उपस्थिती होती. मंचकावर बुलडाणा जिल्हा सेवाधिकारी सुशिल वनवे,प्रा.मनोहर बनसोड,जयंत जहागीरदार,ह.भ.प सिताराम महाराज,ह.भ.प निळकंठ हळदे महाराज, विनोद दिवेकर,तालुका भजन प्रमुख मुकुंद दाते,तालुका सेवाधिकारी विजय पंडीत, जिल्हा कार्यकारिणीचे भिमराव डहाणे, यांची उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्तविक सचिन कुळकर्णी यांनी केले.या कार्यक्रमाला श्रेयस वार्डेकर,श्याम वार्डेकर,दया वार्डेकर' आकांक्षा राउत,अर्चना क्षीरसागर,पुंडलिक पन्नासे,विनोद दिवेकर,भास्कर ठाकरे,आनंद क्षिरसागर मिलींद क्षीरसागर यांचेसह कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे संचालन गुरुदेव सेवामंडळाचे अध्यक्ष गोपाल क्षीरसागर यांनी तर आभार जिल्हा सचिव डॉ.सुधाकर क्षिरसागर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने करण्यात आली. या प्रसंगी महाप्रसादाचा लाभ तीनशेच्यावर भाविक भक्तांनी घेतला. या कार्यक्रमाला महीला,पुरुष,युवक युवती,लहान मुलांची उपस्थिती होती.

Web Title: Welcome of rashtransant palkhi in mangrulpir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.