कडक निर्बंधात पोफळे कुटुंबीयांनी खाेदली विहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:25+5:302021-06-18T04:28:25+5:30
वाशिम :कोरोन संसर्गामुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना कुठे लॉकडाऊन तर कुठे कडक निर्बंध लादण्यात आले होते. वाशिम जिल्ह्यात कडक ...
वाशिम :कोरोन संसर्गामुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना कुठे लॉकडाऊन तर कुठे कडक निर्बंध लादण्यात आले होते. वाशिम जिल्ह्यात कडक निर्बंंध असताना रिकाम्या वेळेचा सदुपयोग करीत जामखेड येथील पोफळे कुटुंबीयाने विहीर खोदून पाणी टंचाईला तोंड दिल्याचे दिसून येत आहे.
मालेगाव तालुक्यातील जउळका रेल्वेनजीक जामखेड येथील रामदास पोफळे कोरोनामुळे कामधंदा नसल्याने गुजरातहून गावाकडे परत आले. कोरोनामुळे कडक निर्बंधात घरी वेळ जात नाही यावेळेस काय करावे काय असा प्रश्न पडला. परंतु गावात पाणीटंचाई असल्याने घरी विहीर खोदावी का यावर पत्नीसोबत चर्चा केली. दोघांची सहमती झाल्यानंतर दोघेही विहीर खोदण्याच्या कामाला लगले. कोरोनाकाळ अनेकांना धडा शिकवून गेला तर या काळात अनेकांनी आयुष्याचे चढ-उतार पहिले, त्यातून अनेक लोक खचून गेले तर अनेकांनी चांगले काम ही केले. अशीच काही सकारात्मक ऊर्जा देणारे कार्य मालेगाव तालुक्यातील जामखेड गावातील एका दांपत्याने करून दाखवले आहे या दांपत्याने कडक निर्बंध काळात २५ दिवसात २० फूट विहीर खोदली असून तिला पाणी लागले आहे. घरी बोअरवेल न घेता विहीर फायदेशीर ठरते आणि आपल्याला असलेली पाण्याच्या गरजेबरोबर इतरांना पाणी मिळू शकले या भावनेतून त्यांनी विहीर खोदली. यामध्ये पत्नी आणि १० वर्षाच्या मुलाचं योगदान मिळाले असल्याो रामदास सांगतात. कोरोनाची भीती आणि वाढता उन्हाचा पारा त्यामुळे बाहेर निघणे कठीण होऊन बसले. अश्यावेळेस एक दीड किलोमीटरवरून पाणी भरण्यासाठीच्या त्रासमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. यावेळी शेजाऱ्यांनीही हसण्यावर घेत त्यांची गंमत उडविली, मात्र त्यांनी खचून न जाता आपला निर्णय कायम ठेवत विहीर खोदण्यास सुरुवात केली व पाणी लागले. कोरोना काळात कोरोनाशी दोन हात करत मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत खोदलेल्या विहिरीची चर्चा पंचक्रोशीत आहे.
...............
पाेफळे कुटुंबीयांची पाणी टंचाईवर मात
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जामखेड गावातील रामदास पोफळे याचं हे कुटुंब कडक निर्बंधामध्ये गुजरातला खासगी कंपनीत काम करीत होते. रामदास यांना कोरोनामुळे गावी परत यावे लागले. मात्र ऐन उन्हाळ्यात गावी आल्याने या गावात नेहमीप्रमाणे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने पाणी टंचाईवर मात करण्याचे या दांपत्याने ठरवले आणि कोरोना काळाच्या रिकाम्या वेळात घरासमोरील अंगणात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना यशही आले. त्यांच्या २० फूट विहिरीला पाणी लागले.