रस्त्यावर थुंकीच्या पिचकाऱ्या मारणाऱ्यांना आता काय म्हणावे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:04+5:302021-06-22T04:27:04+5:30
नंदकिशाेर नारे वाशिम : काेराेना संसर्ग कमी झाला संपुष्टात आला नसला तरी शहरातील नागरिकांनी सर्व नियम धाब्यावर ठेऊन ...
नंदकिशाेर नारे
वाशिम : काेराेना संसर्ग कमी झाला संपुष्टात आला नसला तरी शहरातील नागरिकांनी सर्व नियम धाब्यावर ठेऊन बिनधास्तपणे वावरतांना दिसून येत आहेत. ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंगसाेबतच शहरातील पानठेले उघडल्याने अनेक जण येथे गर्दी करून वाटेल तेथे पिचकाऱ्या (थुंकत) मारत असल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीवरून दिसून आले.
काेराेना संसर्ग राेखण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी म्हणजे वेळाेवळी हात धुणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक आहे. जिल्हा अनलाॅक झाल्याने सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून काही नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले हाेते. परंतु सर्व आवाहनाला शहरातील नागरिकांकडून खाे दिला आहे. चक्क रस्त्यावर, दुकानांच्या आजुबाजूसह अनेक युवक, नागरिक थुंकतांना दिसून येत आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्यांना दंड करण्याचे साथ राेग नियंत्रणाानुसार नियाेजन करण्यात आले हाेते. परंतु अनलाॅक झाल्यानंतर सर्व नियमांना तिलांजली दिल्या जात असल्याचे चित्र वाशिम शहरात दिसून येत आहे.
.................
रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर कारवाईच नाही
काेराेना संसर्ग पाहता अनलाॅकपूर्वी जिल्हा प्रशासनाकडून रस्त्यावर थुंकणाऱ्यांना दंड करण्याचे आदेश देण्यात आले हाेते. यासंदर्भात मात्र काेणतीच कार्यवाही, कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती आहे. या संदर्भात नगरपरिषद प्रशासनाकडेही माहिती नाही.
काेराेना संसर्ग पाहता रस्त्यावर न थुंकण्याबाबत जनजागृती प्रभावी करण्यात आली हाेती. त्या दरम्यान अनेक जणांनी याचे पालन केल्याचे दिसून आले. परंतु अनलाॅक झाल्याबराेबर सर्व नियम नागरिक विसरल्याचे दिसून येत आहे.
............
काेराेना संसर्ग जरी कमी झाला असला तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता घरातून बाहेर निघतांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मास्क न वापरणाऱ्यांना आजही दंड आकारण्यात येत आहे.