दहावीच्या दाखल्यावर शेरा काय असणार; मुख्याध्यापकांसह पालक, विद्यार्थी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:24 AM2021-07-24T04:24:13+5:302021-07-24T04:24:13+5:30

दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देताना त्यावर शाळा सोडल्याची तारीख तसेच शेरा काय लिहायचा, असा प्रश्न निर्माण झाल्याने ...

What will Shera be like on the tenth grade; Parents with principals, students in confusion | दहावीच्या दाखल्यावर शेरा काय असणार; मुख्याध्यापकांसह पालक, विद्यार्थी संभ्रमात

दहावीच्या दाखल्यावर शेरा काय असणार; मुख्याध्यापकांसह पालक, विद्यार्थी संभ्रमात

Next

दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देताना त्यावर शाळा सोडल्याची तारीख तसेच शेरा काय लिहायचा, असा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्याध्यापकही संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे यासंदर्भात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्याशी संपर्क साधला असून मुख्याध्यापकांना आता शिक्षण विभागाच्या सूचनांची प्रतीक्षा लागली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शाळांकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दाखले तयार करण्याचे कामकाज सुरू होते. परंतु, विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर तारीख व शेरा काय लिहायचा, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.

---------

पॉइंटर

-जिल्ह्यातील माध्यमिक शाळा - ३६३

-दहावीतील विद्यार्थी - १९,१९१

-पास विद्यार्थी - १९,१८८

पास झालेल्या मुली - १०,१३२

-पास झालेली मुले -९०५६

----------------

मुख्याध्यापक म्हणतात...

कोट: शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून यासंदर्भात परिपत्रक काढले जाणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र शिक्षण उपसंचालक कार्यालयाने कोणतेही पत्र काढले नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांमध्ये संभ्रम कायम असल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दाखले तयार करण्याचे कामकाज अजूनही सुरू होऊ शकलेले नाही.

-संजीवनी पाथ्रीकर,

मुख्याध्यापिका,

-

कोट: यावर्षी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे शाळांवर दाखले तयार करण्याचे काम वाढले आहे. त्यामुळे दाखले तयार करण्यास सुरुवात करण्यासाठी शाळा सोडल्याची तारीख व शेरा याविषयी शिक्षण विभागाने लवकरात लवकर स्पष्ट सूचना कराव्यात, अशी मागणी मुख्याध्यापकांकडून होत आहे.

-प्रमोद सुडके,

मुख्याध्यापक

---------------

शिक्षणाधिकारी कोट.........

कोट: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर उत्तीर्ण असा शेरा असणार आहे. ११ वी प्रवेशासाठी त्यांना सीईटी द्यावी लागणार असून, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शेरा देण्यासंदर्भात वरिष्ठस्तरावरून मार्गदर्शन घेतले जात आहे. त्यानुसार मुख्याध्यापक आणि शाळांना दाखल्यावर शेरा काय द्याया, याबाबत सुचना देण्यात येतील.

-रमेश तांगडे,

शिक्षणाधिकारी (माध्यमिक )

जि.प. वाशिम

----------

पालक म्हणतात

१) कोट : शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला; परंतु आता पुढील अभ्यासक्रमासाठी सीईटीची परीक्षा सक्तीची केली असून, यासाठी २५ जुलैपर्यंतच मुदत आहे. त्यामुळे शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शेरा देण्याबाबत तातडीने मुख्याध्यापकांना सूचना कराव्यात.

-एस. मनवर,

पालक,

-----

कोट: अकरावीच्या प्रवेशाकरिता सीईटी देण्यासाठी अर्ज दाखल करण्याची २५ जुलै अंतिम मुदत असल्याने पाल्याचा दाखला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात परीक्षेची तारीख आणि शेरा देण्याबाबत संभ्रम असल्याने अडचणीत आहेत.

-विजय ठाकरे,

पालक

Web Title: What will Shera be like on the tenth grade; Parents with principals, students in confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.