तक्रार निवारणासाठी ‘व्हाट्स अँप’चा आधार!
By admin | Published: October 16, 2016 02:29 AM2016-10-16T02:29:27+5:302016-10-16T02:29:27+5:30
वाशिम जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत झाला निर्णय
वाशिम, दि. १५- नागरिकांच्या विविध स्वरूपातील तक्रारींचे विनाविलंब निवारण करता यावे, यासाठी जिल्हा परिषद यंत्रणेच्या वतीने ह्यव्हाट्स अँपह्ण क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. १४ ऑक्टोबरला पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत गाव व तालुकास्तरावरील तक्रारींचे निराकरण करणे, जिल्हा परिषदेंतर्गत येणार्या विविध कार्यालयांकडील प्रलंबित कामांची तक्रार, गावपातळीवरील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय वसतिगृहे, शौचालय बांधकाम, पशुवैद्यकीय दवाखाने तसेच ग्रामसेवक व कृषी विभागाचे कर्मचारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात हजर राहतात अथवा नाही, आदींबाबत ८९७५७६७७४९ या क्रमांकावर ह्यव्हॉट्स अँपह्णव्दारे तक्रार नोंदविता येईल. या उपक्रमाकरिता नोडल अधिकारी म्हणून नागेश थोरात (लघुलेखक) यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर क्रमांकावर तक्रारींची नोंद केल्यास नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत होईल. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी केले आहे.