‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’वरून सरपंचाद्वारे शेतकऱ्यांना किड नियंत्रणासाठी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:04 PM2018-08-27T16:04:24+5:302018-08-27T16:05:05+5:30

मानोरा तालुक्यातील हिवरा खुर्द येथील सरपंच अनिल चव्हाण हे या शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनीच तयार केलेल्या ‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’वर किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्याच्या स्तुत्य उपक्रम राबवित आहेत.

From the 'Whatsaap Group', guide to farmers to control insects | ‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’वरून सरपंचाद्वारे शेतकऱ्यांना किड नियंत्रणासाठी मार्गदर्शन

‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’वरून सरपंचाद्वारे शेतकऱ्यांना किड नियंत्रणासाठी मार्गदर्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: खरीपातील सोयाबीन पिकावर विविध रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. यामुळे शेंगा सुकून गळत असताना शेतकरी चिंताग्रस्त आहे. मानोरा तालुक्यातील हिवरा खुर्द येथील सरपंच अनिल चव्हाण हे या शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनीच तयार केलेल्या ‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’वर किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्याच्या स्तुत्य उपक्रम राबवित आहेत.
मानोरा तालुक्यातील हिवरा खुर्द येथे थेट जनतेतून निवडून आलेले युवा सरपंच अनिल चव्हाण गावविकासाच्या विविध योजना राबवित आहेत. त्यांच्या कार्याची दखल आमदारांनीही घेतली आहे. गावविकासाच्या वेगवेगळ्या योजनांसह सामाजिक माहिती गावकरी आणि सुशिक्षीत मित्रांमार्फत पसरविली जावी म्हणून त्यांनी ‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’ तयार केला आहे. या ग्रुपमध्ये हिवरा खुर्द येथील सुशिक्षित युवक, तज्ज्ञ ज्येष्ठ मंडळी, अधिकाºयांसह शेतकºयांचाही समावेश आहे. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांची माहिती या ग्रुपवर एकमेकांना पाहायला मिळतेच शिवाय राजकीय घडामोडीबाबतही व्यापक माहिती दिली जाते. सद्यस्थितीत खरीपातील सोयाबीन पिकावर करपा, चक्रीभुंगा, खोडअळी आदि रोगांचा प्रादूर्भाव झाला असून, या रोगामुळे शेंगा व झाडे सुकत असल्याने उत्पादन घटण्याच्या भितीने शेतकरी धास्तावले आहेत. शेतकºयांची ही समस्या सरपंच चव्हाण यांच्या लक्षात आली. त्यांनी या रोगावर नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांकडून तांत्रिक माहिती मिळवून ती आपल्या ‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’द्वारे शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामध्ये फवारणीसाठी वापरावी लागणारी औषधे किंवा किटक नाशके आदिंची माहिती ते शेतकºयांना देत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे शेतकºयांना तात्काळ माहिती मिळून रोग नियंत्रण करणे शक्य होत आहे.

Web Title: From the 'Whatsaap Group', guide to farmers to control insects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.