खोडकिडीमुळे १० हजार हेक्टरवरील गहू संकटात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:22 PM2021-01-09T16:22:29+5:302021-01-09T16:24:04+5:30
Washim Agriculture News जिल्ह्यातील १० हजार हेक्टवरील गहू पीक संकटात सापडले आहे.
वाशिम : वातावरणातील बदलामुळे खोड व मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यातील १० हजार हेक्टवरील गहू पीक संकटात सापडले आहे.
यंदा जिल्ह्यात जवळपास २७ हजार हेक्टरावर गहू पिकाची पेरणी झाली आहे. गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. विविध प्रकारच्या किडींसाठी ढगाळ वातावरण पोषक ठरत असल्याने शेतकºयांच्या अडचणीत भर पडत आहे. जवळपास १० हजार हेक्टरवरील गहू पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या कीडीची अळी गहू पीक लहान असताना खोडात जमिनिलगत जाऊन आतील भागाला हाणी पोहचवते. गहु पीक मोठे झाल्यावर ही अळी खोडात जमिनीपासून वर खोडातील भाग खाते, यामुळे दाने न भरताच ओंब्या वाळतात. वानानुसार या किडीचा प्रादुर्भाव कमी-जास्त आढळून येत आहे. या किडिसाठी ढगाळ वातावरण, अधिक उष्णता, जास्त आद्रता असे वातावरण पोषक राहत असल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे. काही ठिकाणी मुळावरील मावा तसेच पाने व खोडावरील मावा किडिंचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
किटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला
गहू पिकावर मावा, खोडकिडींसह अन्य किडींचा प्रादुर्भाव आढळून येत असला तरी नुकसानाची पातळी ओलांडली नाही. ही किड नियंत्रणात येणारी असल्याने शेतकºयांनी घाबरून न जाता कृषी विभागाच्या सल्ल्याने किटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिला.