अतिवृष्टीची नुकसानभरपाई कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:31+5:302021-07-08T04:27:31+5:30

वाईगौळ येथील शेतकरी विलास शेरसिंग राठोड यांच्या गट नं. २१२ मधील लिंबूच्या ३०० झाडांच्या बागेला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला ...

When will I get compensation for excess rainfall? | अतिवृष्टीची नुकसानभरपाई कधी मिळणार?

अतिवृष्टीची नुकसानभरपाई कधी मिळणार?

Next

वाईगौळ येथील शेतकरी विलास शेरसिंग राठोड यांच्या गट नं. २१२ मधील लिंबूच्या ३०० झाडांच्या बागेला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. शासकीय नियमानुसार प्रशासनाद्वारे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. नुकसानग्रस्तांच्या यादीतही विलास राठोड यांचे नाव समाविष्ट झाले, मात्र अद्यापपर्यंत कुठलीही मदत मिळाली नाही.

शेतकरी विलास राठोड हे मेंदुविकाराने ग्रस्त असून, त्यांच्या आईलाही कर्करोगाने ग्रासलेले आहे. त्यामुळे दोघांच्याही उपचारासाठी वर्षाकाठी लाखोंचा खर्च होत आहे. असे असताना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नसल्याने या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. प्रशासनाने सारासार विचार करून तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

....................

बाॅक्स :

वारंवार निवेदने देऊनही मागणी बेदखल

अतिवृष्टीमुळे लिंबूची बाग पुर्णत: जमीनदोस्त झाली. त्याचा पंचनामा होऊनही नुकसानभरपाई आतापर्यंत मिळालेली नाही. यासंबंधी ९ मार्च आणि १८ मार्च २०२१ रोजी प्रशासनाकडे निवेदन सादर केले; मात्र मागणी बेदखल ठरविण्यात आली. त्यामुळे पुन्हा कारंजाच्या उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली.

Web Title: When will I get compensation for excess rainfall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.