पॅसेंजर रेल्वे कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:26 AM2021-06-27T04:26:26+5:302021-06-27T04:26:26+5:30
कोरोना संसर्गाचे संकट जसजसे ओसरू लागले, तसतशा बंद असलेल्या रेल्वेही सुरू करण्यात आल्या. त्यात तिरूपती-अमरावती, नरखेड-काचीगुडा, काचीगुडा-अकोला, जम्मुतावी-नांदेड, हैद्राबाद-जयपूर, ...
कोरोना संसर्गाचे संकट जसजसे ओसरू लागले, तसतशा बंद असलेल्या रेल्वेही सुरू करण्यात आल्या. त्यात तिरूपती-अमरावती, नरखेड-काचीगुडा, काचीगुडा-अकोला, जम्मुतावी-नांदेड, हैद्राबाद-जयपूर, सिकंदराबाद-जयपूर, गंगानगर (बिकानेर)-नांदेड या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. असे असले तरी पुणे-अमरावती, सोलोपूर-नागपूर, इंदाैर-यशवंतपूर आणि नांदेड-गंगानगर या चार एक्स्प्रेस आणि अकोला-परळी व पूर्णा-अकोला या दोन पॅसेंजर रेल्वेगाड्या अद्यापपर्यंत बंदच आहे. त्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
......................................
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
तिरूपती-अमरावती
नरखेड-काचीगुडा
काचीगुडा-अकोला
जम्मुतावी-नांदेड
हैद्राबाद-जयपूर
सिकंदराबाद-जयपूर
गंगानगर (बिकानेर)-नांदेड
.................
या रेल्वेगाड्या पूर्ववत कधी सुरू होणार?
पुणे-अमरावती
सोलापूर-नागपूर
इंदाैर-यशवंतपूर
नांदेड-गंगानगर
अकोला-परळी
पूर्णा-अकोला
अमरावती-पुणे
......................
पॅसेंजर गाड्यांचे घोडे कोठे अडले?
एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या तुलनेत पॅसेंजरने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे.
असे असताना गेल्या वर्षभरापासून पॅसेंजर रेल्वे बंद आहे. यामुळे वाशिमवरून हिंगोली, नांदेड, अकोला, शेगाव, आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची अडचण झाली आहे. रेल्वे विभागाने मात्र पॅसेंजर सुरू करण्यासंबंधी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या गाड्यांचे घोडे कोठे अडले, हे कळायला मार्ग नाही.
..........
प्रवासी काय म्हणतात...
वाशिमवरून हिंगोली, नांदेड, अकोला, शेगाव, अमरावती, पुणे या ठिकाणी ये-जा कराव्या लागणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पॅसेंजर रेल्वेसह अमरावती-पुणे रेल्वे सुरू करायला हवी.
- संदीप चिखलकर
...............
पॅसेंजर रेल्वे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. यामुळे नाइलाजास्तव एसटीने अधिक पैसे खर्चून प्रवास करावा लागत आहे. कोरोनाचे संकट ओसरू लागले असून, रेल्वे विभागाने पॅसेंजर पुन्हा सुरू करावी.
- प्रवीण शिंदे