कृषी योजनांचा लाभ केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:46+5:302021-01-22T04:36:46+5:30

०००० युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण वाशिम : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना शासकीय औद्योगिक ...

When will you get the benefit of agricultural schemes? | कृषी योजनांचा लाभ केव्हा मिळणार?

कृषी योजनांचा लाभ केव्हा मिळणार?

Next

००००

युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण

वाशिम : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शासनमान्य प्रशिक्षण संस्थेत नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे.

0000

केनवड येथे युवा सप्ताहाचा समारोप

केनवड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १९ जानेवारी या कालावधीत केनवड परिसरातील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विविध स्पर्धा, उपक्रम घेण्यात आले. या सप्ताहाचा समारोप २० जानेवारी रोजी झाला.

००००

सात जिल्हा परिषद शाळांचे निर्जंतुकीकरण

रिठद : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार असल्याने रिठद परिसरात पूर्वतयारी केली जात आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या सात शाळांचे निर्जंतुकीकरण व स्वच्छता करण्यात आली आहे.

०००००

वनोजा, आसेगाव येथे आरोग्य तपासणी

रिठद : येथून जवळच असलेल्या आसेगाव पेन व वनोजा येथे प्रत्येकी एकाचा कोरोना चाचणी अहवाल २० जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी केली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने २१ जानेवारी रोजी केले.

Web Title: When will you get the benefit of agricultural schemes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.