रात्री १२ नंतर शहरातील रस्त्यांवर फिरतात तरी कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:46 AM2021-09-21T04:46:57+5:302021-09-21T04:46:57+5:30

०००००००००००००००००० पोलिसांची गस्त म्हणून आपली झोप मस्त - पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी ...

Who walks the streets of the city after midnight? | रात्री १२ नंतर शहरातील रस्त्यांवर फिरतात तरी कोण ?

रात्री १२ नंतर शहरातील रस्त्यांवर फिरतात तरी कोण ?

Next

००००००००००००००००००

पोलिसांची गस्त म्हणून आपली झोप मस्त

- पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी रात्री शहरातील मुख्य चौकात तैनात असतात. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येपासूनच रात्रीची गस्त वाढविण्यात आली होती, तसेच मुख्य चौकांशिवाय इतरही चौकांत रात्री ११ नंतर चोख बंदाेबस्त होता.

-शहरांमध्ये रात्रीच्या वेळेस गुन्हेगार अनेकदा सक्रिय होतात. या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची प्रत्येक मिनिटाला व्हॅनमधून अथवा बाईकवरून गस्त सुरू असते. पोलीस रात्रीच्या वेळेस गस्त घालत असल्यानेच आपल्याला सुरक्षित झोप लागते.

००००००००००००००

शहरांत रात्रीची गस्त

-चारचाकी वाहने- ०३

-दुचाकी - ०६

- कर्मचारी - २०

०००००००००००००००००००००

रिकामटेकड्यांची संख्या जास्त

१) पुसद नाका- वाशिम शहरातील मुख्य चौक असलेल्या पुसद नाका परिसरात रात्री एसटी बसच्या अभावामुळे अनेक प्रवासी खासगी वाहनांची प्रतीक्षा करतात, तर या चौकात अकारण फिरणारेही अनेक दिसतात.

०००००००००००००००००००००००००००

पाटणी चौक: शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पाटणी चौकात मेडिकलची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे रात्री १० ते १०.३० पर्यंत औषधी खरेदीसाठी येथे लोक येत असतात, तर रस्त्याने अकारण फिरणारे दुचाकीस्वारही अनेक असतात. त्यांच्यावर पोलिसांकडून नियंत्रण ठेवले जाते.

०००००००००००००००००००००

डॉ. आंबेडकर चौक: पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. या चौकातूनच पुसद नाका, पाटणी चौक, बसस्थानक, अकोला नाका, परिसरात नागरिकांची सेजा सुरू असते. यासाठी येथे रात्री पोलीस तैनात असतात.

Web Title: Who walks the streets of the city after midnight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.